नवी मुंबई : सिडकोनं (Cidco ) नवी मुंबईतील खारघर, घणसोली, कळंबोली येथील घरांसह विविध प्रकल्पांमधील 902 घरांसाठी (Cidco Lottery 2024) लॉटरी काढलेली आहे. या घरांसाठी अर्ज नोंदणी सुरु झालेली आहे. याच दरम्यान सिडकोकडून आता 101 दुकानांच्या विक्रीसाठी योजना आणली गेली आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरु होणार आहे. 


सिडकोनं आर्थिक विकासाच्या नव्या पर्वाचा हा प्रारंभ असल्याचं म्हटलं आहे. सिडकोच्या बामणडोंगरी येथील गृहसंकुलातील 101 दुकानांच्या विक्रीची योजना काढलेली आहे. यासाठी ई-निविदा आणि ई लिलाव प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.  सिडकोकडून नवी मुंबईतील उलवे नोडमधील बामणडोंगरी गृहसंकुलातील 101 दुकानांच्या विक्रीची योजना सादर करण्यात आली आहे. सिडकोनं याद्वारे व्यावसियाकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचं म्हटलंय.  


नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये 101 घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुकानं उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. बामणडोंगरी येथील गृहसंकुल येथील दुकानांच्या विक्री योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी 30 ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार आहे बंद निविदा सादर करणे, अनामत रक्कम भरणे, प्रक्रिया शुल्क भरणेयासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. तर, ई लिलाव 1 ऑक्टोबरला होणार आहेत. निकालाची घोषणा 3 ऑक्टोबरला केली जाणार आहे. 


सिडकोकडून 902 घरांसाठी लॉटरी 


सिडकोकडून नवी मुंबईतील खारघर, घणसोली, कळंबोली, वास्तू विहार, सेलीब्रेशन, व्हॅली शिल्प या ठिकाणच्या एकूण 902 घरांसाठी लॉटरी काढली आहे. या घरांसाठी अर्ज नोंदणी करण्यास सुरुवात 27 सप्टेंबरपासून झालेली आहे. या योजनेतील घरांची किंमत 26 लाखांपासून 2 कोटी रुपयांपर्यंत आहे. ईडब्ल्यूएस आणि सर्वसाधारण या प्रवर्गांसाठी घरं उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ईडब्ल्यूएस साठी ज्यांचं उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांना अर्ज दाखल करता येतील. याशिवाय जे अर्जदार प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी अर्ज दाखल करु इच्छितात त्यांना पीएम आवास योजनेच्या वेबसाईटवर देखील नोंदणी करावी लागणार आहे.


सिडकोच्या घरांसाठी ज्यांना अर्ज दाखल करायचा आहे त्यांनी सिडकोच्या वेबसाईटला भेट देऊन नोंदणी करायची आहे. सिडकोकडून अर्ज दाखल करण्यासाठी एका महिन्याची मुदत दिलेली आहे. नवी मुंबईतील या घरांसाठी अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. 


दरम्यान, एकीकडे सिडकोनं 902 घरांसाठी लॉटरी काढलेली असताना दुसरीकडे म्हाडानं देखील 2030 घरांच्या अर्ज नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाकडून अर्ज नोंदणीला 19 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 


इतर बातम्या :


Mhada Lottery 2024: मुंबईतील 370 घरं 10 ते 12 लाखांनी स्वस्त केली, आता म्हाडा आणखी एक महत्त्वाचा निर्णय, मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा