How to Check Your CIBIL Score: तुम्ही कर्ज घेण्यासाठी किंवा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी कोणत्याही बँकेत गेल्यास, बँक सर्वात आधी तुमची क्रेडिट हिस्ट्री म्हणजेच CIBIL स्कोर तपासते. बँक किंवा वित्तीय कंपनी तुम्हाला किती व्याजदराने कर्ज देईल, ते तुमचा CIBIL स्कोर किती चांगला आहे यावर अवलंबून आहे. सिव्हिल स्कोअर 300 रुपये ते 900 रुपयांपर्यंत असतो.


साधारणपणे 750 पेक्षा जास्त CIBIL स्कोअर चांगला मानला जातो. अशा परिस्थितीत तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते. त्याच वेळी तुम्हाला बँकांकडून कमी व्याजदरात गृह कर्ज, कार कर्ज, व्यवसाय कर्ज मिळते. CIBIL स्कोर दाखवतो की, तुम्ही यापूर्वी किती कर्ज घेतले आहे आणि कर्ज घेताना तुम्ही परतफेडीला उशीर केला आहे का? तुमचे सर्व वैयक्तिक तपशील, नोकरीचे तपशील, बँक खात्याचे तपशील, मागील कर्जाचे तपशील इत्यादी CIBIL स्कोअर अहवालात नोंदवले जातात.


चांगला CIBIL स्कोर ठेवल्यास होतो हा फायदा 


जेव्हाही तुम्ही बँकेत कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी जाता तेव्हा बँक सर्वात आधी तुमचा CIBIL स्कोर तपासला जातो. त्यानंतरच बँक कर्ज मंजूर करते. यासोबतच चांगला CIBIL स्कोर असल्‍याने तुम्हाला कमी व्याजदरात कर्जाचा लाभही मिळतो. यासोबतच तुम्ही अनावश्यक बँक कागदपत्रांपासूनही वाचता. अशा परिस्थितीत, CIBIL स्कोअर योग्य ठेवण्यासाठी, तुम्ही तुमचे सर्व EMI वेळेवर भरले पाहिजेत. यासोबतच क्रेडिट कार्डचे बिल योग्य वेळी भरा. असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुमचा CIBIL स्कोर खराब होऊ शकतो.


असा तपासा सिबिल स्कोअर 


ग्राहक त्यांचे CIBIL स्कोअर अगदी आरामात तपासू शकतात. तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर विनामूल्य तपासायचा असेल तर तुम्ही https://www.cibil.com वेबसाइटवर क्लिक करू शकता. येथे तुम्ही तुमचे सर्व तपशील आणि पॅन कार्ड क्रमांक टाकून CIBIL स्कोअर तपासू शकता.


इतर महत्वाच्या बातम्या: 


भारत-अमेरिका व्यापार नवीन उंचीवर; चीनला मागे टाकत अमेरिका भारताचा नंबर एकचा व्यापारी भागीदार
10 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 31 मे रोजी Kisan Yojana चे पैसे येणार खात्यात