Chhattisgarh new cm : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत (Chhattisgarh assembly elections) भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर राज्याची सूत्रे कोणाकडे सोपवायची यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून खलबत सुरु होती. पण अखेर भाजपने अखेर  छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची माळ राज्याचे आदिवासी नेते विष्णुदेव साई (vishnu deo sai) यांच्याकडे सोपवली आहे. तुम्हाला माहित आहे का की विष्णुदेव साई हे करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. ते सोने, चांदी आणि हिऱ्याचे शौकीन आहेत.


छत्तीसगडच्या कुंकुरी मतदारसंघातून निवडणूक जिंकलेले विष्णुदेव साई हे भाजपचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या पहिल्या कार्यकाळात ते पोलाद, खाण, कामगार आणि रोजगार राज्यमंत्री राहिले आहेत.


नवे मुख्यमंत्री हे व्यवसायाने शेतकरी 


छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री हे विष्णुदेव साई हे व्यवसायाने शेतकरी आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपले उत्पन्न 10.11 लाख रुपये, तर पत्नीचे उत्पन्न 3.81 लाख रुपये असल्याची माहिती दिली आहे. विष्णुदेव साई यांनी त्यांची एकूण संपत्ती 3.80 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे. त्याच्या संपत्तीमध्ये काय समाविष्ट आहे ते जाणून घेऊया.


विष्णुदेव साई आणि त्यांच्या कुटुंबाकडे एकूण 8 लाखांची रोकड आहे.


बँक ऑफ इंडिया, एसबीआय, इंडियन बँक आणि छत्तीसगड राज्य ग्रामीण बँकेत त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या खात्यांमध्ये एकूण 35.06 लाख रुपये जमा आहेत.


बाँड्स, शेअर्स, डिबेंचर्समध्ये काहीही गुंतवलेले नाही, पण त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावावर एकूण 1.10 लाख रुपयांची एलआयसी पॉलिसी आहे.


विष्णुदेव साई यांच्याकडे दोन ट्रॅक्टर असून त्यांच्या मुलाकडे कार असून या सर्वांची किंमत 25 लाखांहून अधिक आहे.


सोने, चांदी आणि हिरे यांचे शौकीन


विष्णुदेव साई यांच्याकडे स्वतः 30 लाख रुपयांची दागिन्यांची मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीकडे 12 लाख रुपयांची दागिन्यांची मालमत्ता आहे. छत्तीसगडचे भावी मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्याकडे स्वतः 450 ग्रॅम सोने, 2 किलो चांदी आणि हिरे आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे 200 ग्रॅम सोने आणि 3 किलो चांदी आहे. एवढेच नाही तर त्याच्याकडे दोन बंदुका आणि एक रिव्हॉल्व्हर देखील आहे.


करोडोच्या जमिनीचे मालक


विष्णुदेव साईंच्या संपत्तीमध्ये 58 लाख रुपयांची शेतजमीन, 27 लाख रुपयांची बिगरशेती जमीन, 20 लाख रुपयांची व्यावसायिक इमारत आणि 1.50 कोटी रुपयांची निवासी मालमत्ता आहे. मात्र, त्याच्यावर 49 लाखांहून अधिकचे गृहकर्ज आणि एसबीआय बँकेचे 7 लाख रुपयांचे कृषी कर्ज आहे.


विष्णुदेव साई हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले


विष्णुदेव साई 4 वेळा (1999-2014) खासदार म्हणून निवडून आले आहेत. नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात साई यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केले. परंतू 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही, कारण छत्तीसगडमधील 2018 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर भाजपने आपल्या कोणत्याही विद्यमान खासदारांची पुनरावृत्ती न करण्याचा निर्णय घेतला होता. यासोबतच विष्णुदेव साई हे राज्य भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. जून 2020 मध्ये भाजपने माजी केंद्रीय मंत्री विष्णुदेव साई यांची छत्तीसगड प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. ते ऑगस्ट 2022 पर्यंत प्रदेश भाजप अध्यक्षपदावर राहिले.


महत्त्वाच्या बातम्या:


Chhattisgarh New CM : छत्तीसगडमध्ये भाजपचा पुन्हा चकवा; निकालानंतर सातव्या दिवशी अखेर नवा मुख्यमंत्री जाहीर