Gold Rate Today : सध्या सोन्याच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहेत. सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर सोन्याची किंमत 50 हजारांच्या पुढे गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोने 0.01 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. तर, चांदीच्या दरात 0.38 टक्क्यांनी घट झाली आहे.


काय आहे आजचा दर ?


एप्रिलमधील डिलिव्हरीसाठी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर आज 0.01 टक्क्यांच्या वाढीसह 50,119 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर आहे. त्याचबरोबर, आजच्या व्यवहारात चांदी 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह 63,659 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे.


दरवाढीचं नेमकं कारण काय ?


सोने-चांदीच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीकडे पाहता याविषयी तज्ञांचं मत जाणून घेतलं असता तज्ञ म्हणतात, साथीच्या आजाराची भीती, महागाईची चिंता, रशिया युक्रेन आणि मजबूत अमेरिकन डॉलर यांच्यातील सततचा तणाव यामुळे सोन्याचे दर 2022 मध्ये 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीच्या वर जाण्याची शक्यता आहे.


तुमच्या शहराचे दर तपासा :


तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 


अशा पद्धतीने चेक करू शकता सोन्याची शुद्धता :


जर तुम्हाला सोन्याची शुद्धता चेक करायची असल्यास यासाठी सरकारतर्फे एका अॅपची सुविधा करण्यात आली आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून तुम्ही सोन्याची (Gold) शुद्धता (Purity) चेक करू शकता. इतकेच नाही, तर या अॅपच्या माध्यमातून तुम्ही संबंधित कोणतीही तक्रारदेखील नोंदवू शकता.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha