Share Market Updates : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. सेन्सेक्स 281 अंकांच्या घसरणीसह सुरू झाला. तर, निफ्टी 61 अंकांच्या पडझडीसह खुला झाला. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला तणावाचा फटका शेअर बाजाराला बसत आहे. 



आजच्या ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्स 281 अंकांनी घसरून 57551 अंकावर आला. निफ्टी 61 अंकांच्या घसरणीसह 17192 च्या पातळीवर उघडला. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 467 अंकांनी घसरला होता. तर, निफ्टीमध्ये 142 अंकांची घसरण झाली होती.  बाजारातील व्यवहार सुरू होताच 10 मिनिटांत निफ्टी 150 अंकांनी घसरला होता. निफ्टी 50 मधील फक्त 4 कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत.  







मागील आठवड्यात पाच पैकी चार दिवस शेअर बाजारात घसरण दिसून आली होती. आज, सोमवारीदेखील शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंग सत्रापासून बाजारात घसरणीचे संकेत मिळत होते. 


शुक्रवारी शेअर बाजारात ONGC, Divis Labs, UltraTech Cement, Cipla आणि Shree Cements या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. तर,  Coal India, SBI Life Insurance, HDFC, Bajaj Auto and Larsen आणि Toubro या कंपन्यांच्या निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली होती. 


 


 


इतर महत्त्वाच्या बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha