Central Government Budget Session: नरेंद्र मोदी 2.0 सरकार आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2023-24 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्पाची तयारी उद्यापासून करणार आहे. एप्रिल-मे 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प मंदावलेल्या जागतिक दृष्टीकोनाच्या दरम्यान विकासाला चालना देण्यासाठी यामध्ये उपाययोजना असतील, अशी माहिती आहे.
चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या खर्चाचे सुधारित अंदाज आणि 2023-24 च्या निधीची आवश्यकता यावर विविध मंत्रालये आणि विभागांशी सल्लामसलत करून बजेट प्रक्रिया सुरू होईल. सोमवारी, पहिल्या दिवशी, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालय या विभागांशी बैठकांचं सत्र असतील.
10 नोव्हेंबरपर्यंत मंथन
अर्थ मंत्रालयाच्या अर्थसंकल्पीय विभागानुसार, सहकार मंत्रालय, कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्यात 10 नोव्हेंबरपर्यंत अशी एक महिनाभर चर्चा होणार आहे. रेल्वे आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या एकत्रित बैठका पूर्ण होतील.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पाचवा अर्थसंकल्प
2023-24 चे अंदाजपत्रक अर्थसंकल्पीय बैठकीपूर्वी तात्पुरत्या स्वरुपात अंतिम केले जाईल. या बैठका अशा वेळी होणार आहेत जेव्हा भारतीय रिझर्व्ह बँक आणि जागतिक बँकेसारख्या अनेक संस्थांनी भारताच्या विकास दराचा अंदाज अनुक्रमे 7 टक्के आणि 6.5 टक्क्यांवर आणला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा पाचवा अर्थसंकल्प असेल. एप्रिल-मे 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल.
सीतारामन स्वतः भाजीपाला घेण्यासाठी बाजारात
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन भाजी खरेदी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ तामिळनाडूतील चेन्नईच्या मैलापूर मार्केटमधील आहे. शनिवारी अर्थमंत्र्यांनी अचानक मार्केटच्या गाठून भाजीपाला) खरेदीला सुरुवात केली. भाजी खरेदीसोबतच त्यांनी भाजी विक्रेते आणि स्थानिक लोकांशीही संवाद साधला. भाजी मंडईत पोहोचल्यानंतर खरेदीचा व्हिडीओ अर्थमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: