Budget 2024: एनडीए आघाडी (NDA Government) सरकारकडून आता अर्थसंकल्पावर काम करण्यात येतंय 22 जुलै रोजी हा अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे सांगितले जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या (Finance Minister Nirmala Sitharaman) एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करतील. यावेलच्या अर्थसंकल्पाकडून भारतीयांना बऱ्याच अपेक्षा आहेत. दरम्यान, यावेळी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार यावेळच्या अर्थसंकल्पात खर खरेदीदारांना मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. सरकार यावेळच्या अर्थसंकल्पात घरनिर्मितीसाठी नवी हाऊसिंग स्कमी (गृहनिर्माण योजना) लागू करण्याची शक्यता आहे. 


नव्या गृहनिर्माण योजनेची घोषणा होण्याची शक्यता 


यावेळच्या अर्थसंकल्पात घर खरेदी, घर बांधणी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण या अर्थसंकल्पात सरकार गृहनिर्मितीसाठी नवी योजना जाहीर करण्याची शक्यता आहे.  यासह खरेदी करणाऱ्यांना गृहकर्जावरील व्याजात सूट मिळण्याचीही शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकारतर्फे तीन ते सहा महिन्यांपर्यंत गृहकर्जाच्या व्याजावर सहाय्य दिले जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या नव्या योजनेत 50 लाखांपर्यंतच्या घरावरील व्याजावर सहाय्य देण्याची घोषणा सरकार करू कशते याआधी 18 लाख रुपयांपर्यंतच्या घरांवर व्याजावर सहाय्य दिले जायचे. व्याजावरील सहाय्यासाठी घराच्या आकारातही सूट मिळण्याची शक्यता आहे.  


प्रत्येकाकडे स्वत:चे घर असावे, सरकारचे प्रमुख लक्ष


देशात प्रत्येकाकडे पक्के घर असावे, हा अजेंडा सरकारच्या प्राध्यनक्रमावर आहे. त्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. एनडीए सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच याबाबतचे संकेत देण्यात आले होते. मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी आणि सामान्य लोकांशी निगडीत मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये पंतप्रधान आावास योजनेअंतर्गत (PMAY) एकूण तीन कोटी घरांची निर्मिती करण्याच्या मोहिमेला मंजुरी दिली होती.  PMAY-U या योजनेचा कालावधी येत्या डिसेंबर महिन्यात संपणार आहे. त्यामुळे ही योजना संपुष्टात येण्याआधी ही नवी योजना चालू करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. 


पंतप्रधान आवास योजना काय आहे?


केंद्र सरकारने जून 2015 मध्ये पंतप्रधान आवास योजना (PMAY) लागू केली होती. ही योजना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत राबवण्यात आली. ग्रामीण भागात राबवलेल्या योजनेला PMAY-G तर शहरी भागातील योजनेला PMAY- U असे संबोधन्यात आले. या योजनेअंतर्गत सरकार गृहकर्जावर अनुदान देते. घराचा आकार आणि उत्पन्न लक्षात घेऊन हे अनुदान ठरवले जाते. या योजनेअंतर्गत बँकांना कमी व्याजदरावर कर्ज देण्यास प्रोत्साहित केले जाते. गेल्या दहा वर्षात PMAY  या योजनेअंतर्गत साधारण 4.1 कोटीपेक्षा जास्त घरं बांधण्यात आली आहेत. 


हेही वाचा :


अजय देवगणने लाखो गुंतवलेल्या 'या' कंपनीने अनेकांना केलं करोडपती; पाच वर्षांत शेअर बनला रॉकेट!


संधी चुकवू नका! 'हा' नवा आयपीओ तुम्हाला करणार मालामाल, पैसे ठेवा तयार


जुलै महिन्यात तब्बल 12 दिवस बँका बंद! जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी