मुंबई : जून महिना सरत आला आहे. आता जुलै महिना (July Month Holiday List) चालू होण्यासाठी अवघे चार दिवस बाकी आहेत. नवा महिना चालू होताच घर, ऑफिस तसेच इतर ठिकाणांच्या नव्या कामांची आपण यादी तयार करायला लागतो. प्रत्येक नव्या महिन्यात अनेक गोष्टी बदलतात. सरकारी काम करायचे असेल तर शासकीय सुट्ट्या लक्षात घेऊनच आपल्याला कामाचे नियोजन करावे लागते. दरम्यान, आगामी महिन्यात तुम्हाला बँकेशी संबंधित कामे करायची असतील तर बँकांच्या सुट्ट्याही लक्षात घेणे गरजेचे आहे. नाहीतर ऐनवेळी तुमची अडचण होऊ शकते. 


17 जुलैला बहुसंख्य ठिकाणी बँका बंद


जुलै महिन्यात फार मोठे सण नाहीत. पण या महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद असतील. या महिन्यात एकूण चार रविवार तर दोन शनिवार ( दुसरा आणि चौथा शिनवार) यासह विविध सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सहा दिवस बँका बंद असतील. भारत हा देश विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक भागात साजरे केले जाणारे सण आणि उत्सव हे वेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येक भागात वेगवेगळ्या दिवशी बँका बंद आहेत. 17 जुलै रोजी मोहर्रम आहे. त्यामुळे या दिवशी देशाच्या बहुसंख्य भागांत बँका बंद असतील.


या दिवशी बँका असतील बंद 


3 जुलै - बेहदीन खलम (शिलाँग)
6 जुलै- एमएचआयपी डे- (एजोल)
7 जुलै- रविवार- (सर्व ठिकाणी)
8 जुलै- कांग रतयात्रा- (इम्फाळ)
9 जुलै- दुप्का त्से-जी- (गंगटोक)
13 जुलै- दुसरा शनिवार- (सर्व टिकाणी)
14 जुलै-  रविवार- (सर्व ठिकाणी)
16 जुलै- हरेला- (देहरादून)
17 जुलै- मोहर्रम- (बहुसंख्य ठिकाणी)
21 जुले- रविवार- (सर्व ठिकाणी)
27 जुलै- चौथा शनिवार- (सर्व ठिकाणी)
28 जुलै- रविवार- सर्व ठिकाणी


ऑनलाईन बँकिंग राहणार चालू राहणार


दरम्यान, या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुम्हाला बँकेच्या कामाचे नियोजन आखावे लागेल. जुलै महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद असल्या तरी या काळात ऑनलाईन बँकिंग चालूच राहणार आहे. म्हणजे तुम्हाला मोबाईल आणि इंटरनेट बँकेच्या पैशांचे व्यवहार करता येतील. एटीएमच्या माध्यमातूनही तुम्हाला या तुमच्या बँक खात्यातून पैसे काढता येतील.


हेही वाचा :


संधी चुकवू नका! 'हा' नवा आयपीओ तुम्हाला करणार मालामाल, पैसे ठेवा तयार


मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीच्या IPO चर्चा, मालामाल होण्याची नामी संधी; कधीपर्यंत गुंतवणूक करता येणार?


अजय देवगणने लाखो गुंतवलेल्या 'या' कंपनीने अनेकांना केलं करोडपती; पाच वर्षांत शेअर बनला रॉकेट!