Cardless Cash Withdrawal : बदलत्या काळानुसार बँकिंगच्या पद्धतींमध्ये मोठे बदल झाले आहेत. आजकाल फार कमी लोक बँकेच्या लांबच लांब रांगेत उभे राहून पैसे काढतात. बहुतेक लोक एकतर नेट बँकिंग, UPI वापरतात किंवा ATM मधून पैसे काढतात. पण, घरातून बाहेर पडताना जर तुम्ही एटीएम कार्ड ठेवायला विसरलात तर त्यासाठी घरी जाण्याची गरज नाही. देशातील अनेक मोठ्या बँका एटीएम कार्ड नसतानाही ग्राहकांना पैसे काढण्याची सुविधा देतात. अलीकडेच, केंद्रीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे, ज्याद्वारे ग्राहक केवळ UPI च्या मदतीने एटीएम कार्डशिवाय पैसे काढण्याचा फायदा घेऊ शकतात.


या संदर्भात आरबीआयचे (RBI) गव्हर्नर म्हणाले की, आता ग्राहकांना एटीएम कार्डशिवायसुद्धा कार्डलेस कॅश काढण्याच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. देशातील सर्व बँकांचे एटीएम बदलून UPI ​​पर्याय अपडेट केला जात आहे. तर जाणून घेऊयात UPI द्वारे ग्राहक पैसे कसे काढू शकतात-


पहिला मार्ग : 



  • UPI द्वारे पैसे काढण्यासाठी, तुम्हाला प्रथम एटीएम मशीनमध्ये विनंती तपशील भरावा लागेल.

  • हा तपशील भरल्यानंतर, तुमच्याकडे एक QR कोड तयार होईल.

  • त्यानंतर तुम्हाला तुमचे UPI अॅप उघडावे लागेल आणि तो QR कोड स्कॅन करावा लागेल.

  • या स्कॅनिंगनंतर, तुमची विनंती मंजूर केली जाईल.

  • यानंतर, रक्कम भरल्यानंतर, तुम्ही एटीएम मशीनमधून पैसे काढू शकाल.


दुसरा मार्ग :



  • दुसरीकडे, UPI आयडी एटीएम मशीनमध्ये भरावा लागेल 

  • त्यानंतर तुम्हाला जी रक्कम काढायची आहे ती देखील भरावी लागेल.

  • यानंतर तुमच्या UPI अॅपवर एक रिक्वेस्ट येईल, जी भरली पाहिजे.

  • तुम्हाला अॅपमध्ये पिन टाकून विनंती मंजूर करावी लागेल.

  • ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकाल.  


महत्वाच्या बातम्या :