मुंबई : शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुंतवणूकदारांना देखील शेअर बाजारातून चांगला परतावा मिळत आह. काही दिवसांपूर्वी लिस्ट झालेल्या एनटीपीसी ग्रीनच्या आयपीओला देखील गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर शेअर बाजारात आज दोन आयपीओ लिस्ट झाले आहेत. आज लिस्ट झालेल्या दोन्ही एसएमई आयपीओंनी गुंतवणूकदारांना जवळपास 100 टक्के परतावा दिला आहे. यामुळं या आयपीओचा लॉट ज्यांना मिळाला असेल त्यांचे पैसे दुप्पट झाले आहेत. राजपुताना बायोडिझेल आणि सी2 सी अॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेडच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.
सी2 सी अॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेडच्या गुंतवणूकादांची दिवाळी
सी2 सी अॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेडच्या गुंतवणूकदारांची आज दिवळी झाली. या आयपीओमधील एका शेअरचं जे मूल्य निश्चित केलं होतं, त्याच्या दुप्पट परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील एसएमई आयपीओ असलेल्या सी2 सी अॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेडच्या आयपीओचं लिस्टींग 90 टक्क्यांच्या प्रिमियमसह 429.40 रुपयांना लिस्ट झाला.यानंतर काही वेळातच कंपनीच्या शअरला अप्पर सर्किट लागलं. कंपनीचा शेअर 450 रुपयांवर पोहोचला.
सी2 सी अॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेडचा आयपीओ बोली लावण्यासाठी 22 नोव्हेंबरला खुला झाला होता. या आयपीओत गुंतवणूक करण्याची अखेरची संधी 26 नोव्हेंबरपर्यंत होती. कंपनीनं एका समभागाची मूळ किंत 214-226 रुपये निश्चित केल होती. तर कपंनीच्या एका लॉटमध्ये 600 शेअर होते. म्हणजेच हा आयपीओ खरेदी करण्यासाठी 135600 रुपयांची बोली लावणं आवश्यक होतं. तर, कंपनीचा आयपीओच्या माध्यमातून 99.07 कोटी रुपयांची उभारणी करण्याचा प्रयत्न केला होता.
अँकर इनवेस्टर्ससाठी हा आयपीओ 21 नोव्हेंबरला खुला झाला होता. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून 28.23 कोटी रुपये उभारले होते. या गुंतवणूकदारांना जारी करण्यात आलेल्या शेअरपैकी 50 टक्के शेअरसाठी 30 दिवसांचा लॉक इन पिरियड असेल.
सी2 सी अॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेड आयपीओ 125 पट सबस्क्राइब झाला होता. आयपीओला रिटेल गुंतवणूकदारांकडून 132.73 पट, गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 233.13 पट तर संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 31.61 पट बोली लावली होती.
दरम्यान आज राजपुताना बायोडिझेल या कंपनीचा एसएमई आयपीओ देखील लिस्ट झाला. या आपीओनं देखील गुंतवणूकादारांना दमदार परतावा दिला.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)