Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजवर (Reliance industries) सध्या सर्वाधिक कर्ज आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत अदानी कंपनीचे नाव नाही. टाटांची (Tata) कंपनी प्रसिद्ध आहे, पण तिचे कर्ज रिलायन्सपेक्षा खूपच कमी आहे. व्होडाफोन आयडियाच्या कर्जाबद्दल बरीच चर्चा आहे, परंतु रिलायन्सच्या तुलनेत ते खूपच कमी आहे. या यादीत एअरटेल आणि एल अँड टी यांचेही नाव आहे. मात्र, या सर्व कंपन्या मुकेश अंबानींच्या रिलायन्सपेक्षा खूप खाली आहेत. रिलायन्ससह देशाच्या कोणत्या कंपनीवर किती कर्ज आहे त्याबद्दलही माहिती जाणून घेऊयात. 


2020 मध्ये मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज ही कर्जमुक्त कंपनी बनल्याची घोषणा केली होती. त्यावेळी देश कोरोना महामारीचा सामना करत होता. मुकेश अंबानी आपल्या कंपन्यांची इक्विटी विकून जगातील मोठ्या कंपन्यांकडून निधी उभारत होते. आता ताज्या आकडेवारीनुसार, रिलायन्स ही देशातील सर्वात मोठी कर्जदार कंपनी बनली आहे. 


देशातील या कंपन्यांवर सर्वाधिक कर्ज 


Ace Equity च्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वात मोठी कर्जदार कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. या कंपनीवर 3.13 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.


एनटीपीसीचे नाव देशातील मोठ्या ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे. कर्जदार असण्याच्या बाबतीत ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपनीवर 2.20 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.


व्होडाफोन आयडियाच्या कर्जाबाबत बरीच चर्चा आहे. आता या कंपनीत सरकारचीही हिस्सेदारी आहे. सध्या या कंपनीवर 2.01  लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.


भारती एअरटेलही देशात कमी कर्जदार नाही. ही कंपनी देखील प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. ज्याची वेळोवेळी चर्चा होत असते. सध्या कंपनीवर 1.65 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.


देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचेही नाव या यादीत आहे. सध्या या कंपनीवर 1.40 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.


तेल आणि नैसर्गिक वायूवरील कर्जही कमी नाही. कच्च्या तेलाचा व्यवहार करणाऱ्या या कंपनीवर 1.29 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.


एनटीपीसीनंतर या यादीतील दुसरी कंपनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन आहे. सध्या कंपनीवर 1.26 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.


या यादीत टाटा मोटर्सचाही समावेश आहे. हे ऐकूण तुम्हालाही धक्का बसेल. एका अहवालानुसार, कंपनीवर 1.25 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.


चांद्रयान मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारी लार्सन अँड टुब्रो ही कंपनीही कमी कर्जदार नाही. या कंपनीवर सध्या 1.18 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.


या यादीत ग्रासिम इंडस्ट्रीज ही शेवटची कंपनी आहे जिच्यावर 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. सध्या कंपनीवर 1.01 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


तुम्हाला मुकेश अंबानी एवढी संपत्ती मिळवायला किती वर्षे लागतील? असं आहे कॅल्क्युलेशन