lemon News : लिंबाचे (lemon) अनेक फायदे तुम्ही ऐकले असतील. त्यात व्हिटॅमिन सी मुबलक असल्याने, डॉक्टर देखील त्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात. आरोग्याबाबत वाढत्या जागरुकतेमुळं लिंबाचा वापर (लिंबू लागवड) वाढला आहे. उन्हाळ्यात तर त्याचे भाव गगनाला भिडतात. पण तुम्हाला माहिती आहे का? की अनेक शेतकरी याच्या लागवडीतून दरमहा दीड लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहेत. त्यामुळं कागदी लिंबाची लागवड करुन तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. 


कागदी लिंबाची लागवड करा, चांगला नफा मिळवा 


अलीकडच्या काळाज कागदी लिंबाच्या लागवडीत वाढ होत आहे. कागदी लिंबाचे एक रोप सुमारे 200 रुपयांना मिळते. विशेष म्हणजे हे लिंबाचे एक झाड सलग 12 वर्षे फळ देते. एवढेच नाही तर लिंबाच्या या जातीमध्ये सामान्यपेक्षा जास्त फळे आहेत. एका झाडाला 3 हजार ते 5 हजार लिंबे येतात. यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.


लिंबाच्या बागा लावणारे शेतकरी


अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कागदी लिंबाच्या 200 ते 300 रोपांची लागवड केली आहे. ज्यामध्ये सुरुवातीला उत्पादन कमी होते. पण हळूहळू उत्पादन वाढत जाते. त्यानंतर शेतकरी लिंबू लागवडीतून दरमहा दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवू शकतात.


काळजी घेणं आवश्यक


लिंबाची लागवड केल्यानंतर सुरुवातीला त्याची योग्य काळजी घ्यावी. कारण चांगली काळजी घेतल्यावर उत्पादनही चांगले होऊ शकते. त्यामुळं शेतकरी वर्षातून तीन वेळा पीक घेतात. यामध्ये एकावेळी 15 हजार ते 20 हजार लिंबू सहज काढता येतात. घाऊक बाजारात एक लिंबू किमान तीन रुपयांना विकले जाते.


नुकसान टाळण्यासाठी कीटक आणि रोगांकडे लक्ष द्या


लिंबू पिकावर अनेक प्रकारच्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याचीही शक्यता आहे. जे वेळेवर ओळखणे आवश्यक आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही बसू शकतो. त्यामुळं लिंबाला योग्य वेळी खत-पाणी देणं गरजेचं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


success story : शेतात लिंबाची फक्त 10 झाडं, नफा मिळतोय तीन लाख; वाचा एका क्लिकवर यशोगाथा