Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज अंतरीम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या (Modi Government) दुसऱ्या टर्मचा हा अखेरचा अर्थसंकल्प (Union Budget 2024) असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होणार असल्याने केंद्राकडून सर्वसामान्यांना खूश करण्याचा प्रयत्न होताना दिसेल.  अर्थसंकल्पाचा 163 वर्षांचा इतिहास तुम्हाला माहितेय का ? अर्थसंकल्पाचे फायदे काय? बजेटचा आठ शब्दांत अर्थ माहितेय का ? अर्थसंकल्प सकाळी 11 वाजताच का सादर करतात ? आतापर्यंत कुणी कुणी अर्थसंकल्प सादर केला? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.... 


अर्थसंकल्प हे माहीत आहे का?


अनेक महिने अर्थसंकल्प बनवण्याचं काम चालतं


सल्लामसलत, नियोजन, अंमलबजावणी ही त्रिसूत्री


वित्त मंत्रालय, नीती आयोगाशी चर्चा करून अर्थसंकल्प


सर्व, मंत्रालयं, राज्यांना अंदाजपत्रक सादरकरण्याची सूचना


गतवर्षातील महसूल, खर्चचा तपशील मागवला जातो


जमा झालेला महसूल आणि खर्चाची तुलना केली जाते


तूट भरून काढण्यासाठी कर्जाची पातळी ठरवली जाते


शिफारशींचा अभ्यास करून विभागवार निधीची तरतूद


कृषी, उद्योग, व्यापार पायाभूत सुविधांच्या तज्ज्ञांशी चर्चा


अर्थ खात्यातील कर्मचाऱ्यांना हलवा वाटून छपाईला सुरूवात


बजेट लीक होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी लॉक इन केलं जातं


अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अधिकाऱ्यांना बाहेर येण्याची मुभा


2016 सालापर्यंत फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी बजेट सादर व्हायचं


2017 सालापासून 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणं सुरू


2019 मध्ये चामड्याच्या ब्रीफकेसमधून बजेट घेऊन जाणं बंद


ब्रीफकेसची परंपरा मोडून 'बही खता'मधून बजेट नेण्यास सुरूवात


2021 साली पहिल्यांदाच पेपरलेस अर्थसंकल्पाचं वितरण


सीतारामन यांनी 23 जानेवारी 2021 ला बजेटचं मोबाईल ॲप लाँच केले


निर्मला सीतारमण यांच्याकडून यंदा सलग सहाव्यांदा बजेट सादर


बजेटचा 163 वर्षांचा इतिहास


भारताचा पहिला अर्थसंकल्प ब्रिटिश राजवटीत


7 एप्रिल 1860 रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प


ईस्ट इंडिया कंपनीकडून इंग्लडच्या राणीकडे सत्ता


पहिले ब्रिटिश वित्त सभासद जेम्स विल्सन यांनी मांडलं बजेट


26 नोव्हेंबर 1947 ला आर. के. षण्मुखम् चेट्टींनी बजेट मांडलं


26 नोव्हेंबर 1947 ला स्वतंत्र भारताचा अखंड अर्थसंकल्प


1947-48 अर्थमंत्री लियाकत अली खान यांनी मांडलं बजेट


1949 साली जॉन मथाई यांनी अर्थसंकल्प सादर केला


1950 साली जॉन मथाईंनी बजेट लीक केल्याचा आरोप


बड्या उद्योजकांच्या हितासाठी बजेट लीक केल्याचा आरोप


1950 पूर्वी अर्थसंकल्प राष्ट्रपती भवनात मांडला जात होता


बजेट फुटल्याच्या आरोपानंतर दिल्लीच्या मिंटो रोडवर छपाई


1980 सालानंतर नॉर्थ ब्लॉकमध्ये अर्थसंकल्पाची छपाई सुरू


1999 सालापूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता मांडला जाई


अर्थसंकल्पाचे फायदे काय?


महागाई, चलनवाढीसारख्या व्यवसायातील चढ-उतार रोखणे


मागणी, खासगी गुंतवणूक घटल्यास आर्थिक तरतुदीची संधी


सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या व्यवस्थापनासाठी तरतुदी शक्य


श्रीमंतांना कर लावून सामान्य जनतेचं हित साधणं शक्य होतं


अर्थसंकल्पीय खर्चाद्वारे मागणी आणि पुरवठा स्थिर ठेवता येतो


8 शब्दांत अर्थ बजेटचा


 1 आर्थिक वर्ष


सरकारचा अर्थसंकल्प आर्थिक वर्षासाठी असतो


 2 एकूण मूल्य


वर्षात उत्पादित झालेल्या वस्तू-सेवांचं एकूण मूल्य


 3 वित्तीय तूट


केंद्र सरकारचे उत्पन्न आणि खर्च यातील तफावत


4 प्रत्यक्ष कर


देशातील नागरिक थेट सरकारला भरतात तो कर


5 अप्रत्यक्ष कर


उत्पादन, सेवा प्रदात्यांना आकारण्यात येतो तो कर


6 राजकोषीय धोरण


उत्पन्न-खर्चाची सांगड घालण्यासाठीचं वित्तीय धोरण


7 भांडवली खर्च


भौतिक मालमत्ता निर्मितीसाठी सरकारी खर्च


8 महसुली तूट


अंदाजापेक्षा उत्पन्न घटल्यानंतर निर्माण होणारी स्थिती


बजेट लीक झाल्यास धोके काय?


शेअर बाजारात मोठी पडझड किंवा मोठी उसळी


एखाद्या विशिष्ट कंपन्यांना वारेमाप फायदा होऊ शकतो


सरकारी आर्थिक नियोजनात मोठा गोंधळ होऊ शकतो


सरकारच्या आर्थिक धोरणांबाबत अविश्वास होऊ शकतो


बजेट सकाळी 11 वाजताच का मांडतात?


1999 सालापूर्वी बजेट संध्याकाळी 5 वाजता मांडत


वेळेबाबतची ब्रिटिश परंपरा वाजपेयींच्या काळात बंद


1999 साली यशवंत सिन्हांनी स. 11 वाजता बजेट मांडलं


बजेट मांडल्यावर त्याच्या विश्लेषणाला वेळ मिळण्यासाठी


माध्यमांना मुलाखती देणं, तरतुदींच्या विश्लेषणासाठी वेळ


आतापर्यंत कुणी मांडला अर्थसंकल्प  


जेम्स विल्सन (स्वातंत्र्याआधी)


लियाकत अली खान (स्वातंत्र्यानंतर)


आर. के. षण्मुखम् चेट्टी


जॉन मथाई


सी. डी. देशमुख


टी. टी. कृष्णमचारी


जवाहरलाल नेहरू


मोरारजी देसाई


टी. टी. कृष्णमचारी


सचिंद्र चौधरी


मोरारजी देसाई


इंदिरा गांधी


यशवंतराव चव्हाण


चिदंबरम सुब्रमण्यम


एच. एम. पटेल


चौधरी चरण सिंग


हेमवतीनंदन बहुगुणा


आर. वेंकटरमण


प्रणव मुखर्जी


विश्वनाथ प्रताप सिंग


राजीव गांधी


नारायण दत्त तिवारी


शंकरराव चव्हाण


मधू दंडवते


यशवंत सिन्हा


मनमोहन सिंग


जसवंत सिंग


पी. चिदंबरम


इंद्रकुमार गुजराल


पी. चिदंबरम


यशवंत सिन्हा


जसवंत सिंग


पी. चिदंबरम


मनमोहन सिंग


प्रणव मुखर्जी


मनमोहन सिंग


पी. चिदंबरम


अरुण जेटली


पियूष गोयल


निर्मला सीतारमण (सलग 6 वर्ष)