Union Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 (Union Budget 2022-23) सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिव्यांगांसाठी करात सवलत दिली जाणार असल्याचे म्हटले आहे.
‘दिव्यांग व्यक्तीचे पालक किंवा अशा व्यक्तीचा सांभाळ करणारी व्यक्ती संबंधित दिव्यांग व्यक्तीसाठी विमा योजना घेऊ शकतात. सध्याच्या कायद्यानुसार, पालक किंवा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दिव्यांग व्यक्तीला एकरकमी पेमेंट किंवा अॅन्युइटी मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे’, असे निर्मला सीतारमण म्हणाल्या.
‘मात्र, अशीही परिस्थिती उद्भवू शकते जेव्हा दिव्यांग व्यक्तीला त्यांच्या पालकांच्या किंवा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीच्या हयातीतही वार्षिकी किंवा एकरकमी रक्कम काढण्याची आवश्यकता भासू शकते. आम्ही अशा प्रकारे वार्षिकी किंवा एकरकमी रक्कम वेगळ्या पद्धतीने देण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव मांडत आहोत’, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.
कर रचनेत बदल नाहीत!
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदीसदृष्य परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये आता काहीशी सुधारणा होत असून अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येताना दिसत आहे. पण गेल्या दोन वर्षांचा विचार करता केंद्र सरकारने या वर्षीच्या कर रचनेत बदल व्हावी आणि ती कमी करण्यात यावी अशी मागणी होत होती. पण या वर्षी त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा :
- आरबीआयचे डिजिटल चलन
- चिप असलेले पासपोर्ट
- ईलेक्ट्रिक वाहन बॅटरी अदलाबदली धोरण
- देशात 60 लाख नव्या नोकऱ्या
- पोस्टात कोअर बँकिंग सुविधा
- रसायन, कीटनाशकमुक्त शेतीला प्राधान्य
- संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी 25 टक्के बजेट
- शालेय शिक्षणासाठी 100 टीव्ही वाहिन्या
- 2022 मध्ये 5 जी सेवा सुरु करणार
- 3.8 कोटी घरांमध्ये नळाचं पाणी
- मालमत्ता नोंदणी कुठूनही करण्याची सुविधा
- क्रिप्टो करन्सी कमाईवर 30 टक्के कर
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- No Change in Tax Slabs: महत्त्वाची बातमी! कर रचना 'जैसे थे', कोणताही बदल नाही; अर्थमंत्र्यांची घोषणा
- Income Tax: आयकर रिटर्न भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दोन वर्षांपूर्वीच्या चुका सुधारण्याची संधी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha