Maharashtra Agricultural Budget 2021 : 'आजच्या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने सर्वांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आहे. आजचं बजेट महाराष्ट्राच्या विकासाला बळकटी देणारं नाही', अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली आहे. राज्याने उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharsahtra Budget 2022) नुकताच सादर केला. ज्यानंतर विविध प्रतिक्रिया या बजेटवर येत असून विरोधी पक्षाने यावर जोरदार टीका केली आहे.
तसंच मागील बजेटमध्ये आमचं सरकार असताना केलेल्या घोषणा आजच्या सरकारने पुन्हा केल्या असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच समृध्दी महामार्ग बुलेट ट्रेनला विरोध करणाऱ्या सरकारने आता याबाबत घोषणा केल्या आहेत. तसंच अर्थव्यवस्था 12 टक्क्यांनी वाढ होणार आहे, असं म्हणतात आणि आता पेट्रोल डिझेल वरील एक रुपयाही कमी करतं नाही. असंही फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांची मदत केलीच नाही
शेतकऱ्यांबाबत केलेल्या घोषणांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, 'सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही. त्यांनी अधिक कर्ज दिल, त्याची किंमत सांगितली माञ खाती सांगितली नाहीत. तसंच चक्रीवादळ, पीक विमा यासाठी मदत मिळालेली नाही. काही विवक्षित घोषणा सोडल्या तर समजातील इतर कुठल्याही घटकाला काहीही मिळालेलं नाही, असंही फडणवीस म्हणाले.
मराठवाडा, विदर्भावर अन्याय
मराठवाडा विदर्भावार या बजेटमधून अन्याय झाला आहे. मराठवाडा ग्रीड साठी एक रुपयाही दिलेला नाही. दुष्काळमुक्तीचे संकल्प केले माञ एक पैसा दिला नाही. या बजेटने घोर निराशा केली आहे. सरकारने किमान एसटी कामगारांची मागणी मान्य करायला हवी होती. ती देखील केली नाही. अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Budget 2022 : छ. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव, पर्यटना विकासासाठी आणखी कोणत्या घोषणा?
- Maharashtra Budget 2022: उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राची आघाडी, राज्याचा अर्थिक पाहणी अहवाल सादर
- Maharashtra Budget 2022 : शिवरायांना वंदन करुन अजितदादांनी मांडला अर्थसंकल्प; छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटींचा निधी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha