Maharashtra Budget 2022 महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा 2022-23  या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याआधी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडून 250 कोटींचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. 


भूविकास बँकांच्या कर्जदारांचं 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा


भूविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदारांकडे असणारे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत काही बदल करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यामध्ये जर बदल केले नाहीत, तर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी अन्य पर्यायांचा विचार करेल असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील विकासावर परिणाम झाला आहे, त्यामुळे आता राज्याचा आर्थिक विकास अधिक गतीने करण्यासाठी पंचसुत्री हा कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. येत्या 3 वर्षात यासाठी 4 लाख कोटी उपलब्ध करण्यात येणार आहेत.


अजित पवारांनी केलेल्या महत्वाच्या घोषणा


शेततळ्यांना आता 75 हजारांचे अनुदान देणार


मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी


60 हजार कृषी पंपांना वीज जोडणी देणार


गोसीखुर्द प्रकल्पासाठी 850 कोटी रूपये उपलब्ध करून देणार

महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30टक्केची तरतूद आता वाढवून ५० टक्के केलेली आहे.


कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहनपर देणार


कोरोनामुळे पंचसूत्री अर्थसंकल्पावर भर देणार

बाळासाहेब पाटील कृषी संशोधन केंद्र स्थापन करणार

हळद संशोधन 100 कोटी

विदर्भ आणि मराठवाडा सोयाबीन केंद्र, 3 वर्षात 1 हजार कोटी खर्च करणार

मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया योजना राबवण्यात येणार आहे

कोकण कृषी आणि वसंतराव नाईक विद्यापीठांना 50 वर्ष पूर्ण होणार असल्याने 50 कोटींचा निधी

कृषी निर्यात धोरण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य

हवेलीत संभाजीराजेंच स्मारक उभारणार