Maharashtra Budget 2022 : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. यावेळी महिला व बालविकास योजनांसाठी देखील घोषणा करण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे,
महिला व बालविकाससाठी अर्थसंकल्पात काय?
ई-शक्ती योजना- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंमलबजावणीत अधिक अचूकता, सुलभता व तत्परता यावी यासाठी ई-शक्ती योजनेतून 1 लाख 20 हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका भगिनींना मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. तसेच बालसंगोपनासाठीच्या निधीतही वाढ करण्यात आली असून 0 ते 18 वयोगटातील बालकांचे पालन करणाऱ्या संस्था किंवा कुटुंबाला दर महिन्याला देण्यात येणाऱ्या प्रतिबालक अनुदानात 1125 रुपयांवरुन 2 हजार 500 रूपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या एकूण निधीपैकी 3 टक्के निधी महिला व बालविकास योजनांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय झाला आहे. त्यातून प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी “अमृत महोत्सवी महिला व बाल भवन” उभारण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. नागरी बाल विकास केंद्र-नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्रांच्या धर्तीवर नागरी बाल विकास केंद्रे सुरु करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. सॅनिटरी नॅपकीनसाठी मशिन बसविणे, आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिंनीसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन डिस्पेन्सींग मशिन बसविण्यात येणार आहेत.
बजेटमधील दहा महत्वाच्या घोषणा
जलसंपदा विभागासाठी 13252 कोटींच्या निधीची तरतूद
मागासवर्ग समर्पित आयोग स्थापन करणार
तृतीय पंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देणार
आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद कर्करोग व्हॅनसाठी करणार 8 कोटींची तरतूद
आंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबाईल सेवा उपलब्ध करून देणार
मुंबई प्रमाणे राज्यात इतर ठिकाणी एसआरएसाठी 100 कोटी रुपयांचा निधी
15 हजार 773 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते बांधण्यासाठी तर इमारत बांधण्यासाठी 1 हजार कोटी
एसटी महामंडळ 3 हजार नवीन बस देणार आहेत
महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30 टक्केची तरतूद आता वाढवून 50 टक्के केलेली आहे. कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर देणार
संबंधित बातम्या
Maharashtra Budget : कर्जमाफी, अनुदानात वाढ; महाविकास आघाडीच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी काय?
Maharashtra Budget 2022 : शेतकऱ्यांना दिलासा, भूविकास बँकांचे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ, अजित पवारांची घोषणा
Maharashtra Budget 2022 : शिवरायांना वंदन करुन अजितदादांनी मांडला अर्थसंकल्प; छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटींचा निधी