नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राज यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भारतीय अर्थव्यवस्था एका व्यक्तीच्या मर्जीवर चालू शकत नाही, असं म्हणत रघुराम राजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींना लक्ष्य केलं. भारताची अर्थव्यवस्था खुप मोठी आहे. त्यामुळे केवळ एक व्यक्ती ही अर्थव्यवस्था चालवू शकत नाही, आपण हे अनुभवलं आहे, असं रघूराम राज यांनी म्हटलं आहे. ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चर देत असताना रघूराम राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल वक्तव्य केलं.


रघूराम राजन यांनी या आधीही मोदी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एक व्यक्ती जर भारतीय अर्थव्यवस्थेविषयीचे निर्णय घेत असेल ते घातक आहे. वित्तीय तूट वाढल्यास त्याचा नकारात्मक परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर पडतो आणि त्यातून बाहेर पडण्यास बराच कालावधी लागतो. सरकारने अद्यापही ठोस पाऊल न उचल्याने अर्थव्यवस्था सुस्तावलेली आहे, याबाबत रघूराम राजन यांनी चिंता व्यक्त केली.


गेल्या काही वर्षांत सुस्थितीत असलेली भारतीय अर्थव्यवस्था काही प्रमाणात ढासळली आहे. 2016 च्या पहिल्या तिमाहीत विकासदर 9 टक्के होता. सध्याच्या जीडीपीतील घसरणीसाठी गुंतवणूक, आयात, विक्री यांमधील मंदी कारणीभूत असल्याचं रघूराम राजन यांनी सांगितलं.


देशातील आर्थिक मंदीला जीएसटी, नोटाबंदी काही प्रमाणात रघुराम राजन यांनी जबाबदार धरलं. जीएसटी नियोजन न करता लागू केला गेला. नोटबंदी आणि जीएसटी योग्य विचारविनिमय करुन लागू केले असते तर आज अर्थव्यवस्थेची अवस्था अशी चांगली असती. नोटबंदी लागू करुन काहीही उपयोग झाला नाही, उलट लोकांचं यामुळे नुकसान झाल्याचं रघुराम राजन यांनी म्हटलं.