Finance Minister Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) यांनी आज 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी एका योजनेची घोषणा केली आहे. या योजनेचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून वर्षभरात नागरिकांची तब्बल 18,000 रुपयांची बचत होणार आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत एक कोटी घरांना दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे. 


2026 पर्यंत 40 हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट 


प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत एक कोटी घरांना दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे. यामुळं ग्राहकांचे दरवर्षी 15,000 ते 18,000 रुपयांची बचत होईल, असा दावा केला जात आहे. या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी केली होती. याअंतर्गत गरीब किंवा मध्यमवर्गीय लोकांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत. यामुळं लोकांचे वीज बिल भरण्यापासून वाचणार आहे. ते अतिरिक्त वीज विकू शकतात. या योजनेंतर्गत 2026 पर्यंत 40 हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही यशस्वी करण्यासाठी मोठी राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज आहे. सरकारनं 2014 मध्ये सौभाग्य योजना सुरू केली आहे. यामध्ये घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवून 2022 पर्यंत 40,000 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सरकारी आकडेवारीनुसार, डिसेंबर 2023 पर्यंत या योजनेद्वारे केवळ 11,000 मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकली. आता या योजनेला चालना देण्यासाठी पंतप्रधान सर्वोदय योजना सुरू करण्यात आली आहे. याचा फायदा फक्त गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांनाच होणार आहे.


काय होणार फायदा? 


या योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना कमी वीज बिल येणार आहे. त्यांची वार्षिक 18,000 रुपयांपर्यंत बचत होईल. या योजनेसाठी पात्र असलेले लोक त्यांच्या रिकाम्या छताचा वीज निर्मितीसाठी योग्य वापर करू शकतात. वीज ग्राहकांना सौर पॅनेल बसवण्यासाठी जमीन खरेदी करण्याची गरज भासणार नाही. यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि देशात स्वच्छ ऊर्जेला चालना मिळेल.


या योजनेसाठी कोण पात्र असणार?


प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ सरकारी प्रत्येक भारतीयाला मिळेल. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. गरीब वर्ग, मध्यमवर्गीय आणि गरजू लोक या योजनेसाठी पात्र असतील. अर्जदाराकडे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, वीज बिल, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो किंवा रेशन कार्ड यांसारखी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.


कसा कराल अर्ज?  


प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://solarrooftop.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला होम पेजवर Apply निवडावे लागेल. वापरकर्त्याला त्याच्या राज्य आणि जिल्ह्यानुसार सर्व माहिती द्यावी लागेल. वीजबिल क्रमांक दिल्यानंतर वीज खर्चाची माहिती व मूलभूत माहिती, सोलर पॅनलचा तपशील द्यावा लागेल.


महत्त्वाच्या बातम्या:


संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात तरतूद किती? अर्थमंत्री सीतारामन यांनी केली मोठी घोषणा