Defence Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Minister Nirmala Sitharaman) यांनी आज सकाळी 11 वाजता अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी आज सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण खर्चात वाढ केली आहे. सरकारचे संपूर्ण लक्ष देशाच्या सुरक्षेवर आहे. निर्मला सीतारामन यांनीही संरक्षण अर्थसंकल्पाबाबत मोठी घोषणा केली आहे. अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण खर्च मागील अर्थसंकल्पातील 5.94 लाख कोटींवरुन 6.25 लाख कोटी रुपये करण्यात आला आहे.


 FY24 च्या अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयाला सर्वाधिक 5.94 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, जी सरकारच्या एकूण बजेट खर्चाच्या 13.2 टक्के होती. आर्थिक वर्ष 23 मध्ये, सरकारने 5.25 लाख कोटी रुपयांचे बजेट ठेवले होते, जे सुधारित करून 5.85 लाख कोटी रुपये करण्यात आले. FY24 मध्ये, सरकारने 5.94 लाख कोटी रुपयांचे बजेट मांडले, जे FY23 मधील सुधारित खर्चापेक्षा 1.5 टक्के जास्त आहे. आता संरक्षण खर्च GDP च्या 3.4% असेल. अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी सरकारच्या कामगिरीची माहिती दिली.


स्वावलंबन वाढेल


संरक्षणाबद्दल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की नवीन डीप-टेक तंत्रज्ञान सादर केले जाईल. आत्मनिर्भरता वाढेल. डीप टेक तंत्रज्ञान म्हणजे क्वांटम कंप्युटिंग, एआय, रोबोटिक्स, ग्रीन एनर्जी, प्रगत संगणन आणि एरोस्पेस सारख्या उद्योगांचा समावेश आहे. आता देशाच्या संरक्षण क्षेत्रात खासगी कंपन्यांना अधिक संधी मिळणार आहेत. देशाला अधिक सामर्थ्यवान बनवण्याची सरकारची योजना आहे. संरक्षण मंत्रालयाने आपल्या वर्षाच्या अखेरच्या आढाव्यात म्हटले होते की, संरक्षण संपादन परिषदेने (DAC) 2023 मध्ये भारताच्या सशस्त्र दलांची ताकद वाढवण्यासाठी 3.50 लाख कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. याव्यतिरिक्त, DAC ने फ्रेंच संरक्षण क्षेत्रातील कंपनी डसॉल्ट एव्हिएशनकडून भारतीय नौदलासाठी संबंधित उपकरणे, शस्त्रे, सिम्युलेटर आणि स्पेअर्ससह २६ राफेल सागरी विमाने खरेदी करण्यास मान्यता दिली. FY22 मध्ये संरक्षण खर्चावर जवळपास 5 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले.


मजबूत सशस्त्र दलांची गरज


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये सांगितले होते की 2047 पर्यंत जेव्हा आपण स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करू तेव्हा भारताला विकसित देश होण्यासाठी आधुनिक उपकरणांसह मजबूत सशस्त्र दलांची आवश्यकता आहे. जर आपल्याला विकसित राष्ट्र घडवायचे असेल तर आपल्याला आधुनिक शस्त्रे आणि उपकरणे असलेले मजबूत सशस्त्र दल हवे आहे. सध्या भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. भारत या बाबतीत जपान आणि इंग्लंडसारख्या विकसित देशांच्या पुढे आहे. चीन ही तिसरी मोठी लष्करी शक्ती आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


देशवासियांची मनं जिंकणारा, विकसित भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प, अजित पवारांनी केलं स्वागत