नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांवर मोठा आरोप केला आहे. बजेट तयारीच्या बैठकीला अर्थमंत्री अजित पवार फिरकलेच नाहीत, यांना बजेटचं काही पडलेलं नव्हतं असा हल्लाबोल भागवत कराड यांनी अजित पवारांवर केला आहे.


 भागवत कराड म्हणाले, हा देशाचा अर्थसंकल्प आहे. रेल्वे, ट्रान्सपोर्ट, शिक्षण या सगळ्यासाठी राज्याला निधी देण्यात आला आहे.  महाराष्ट्रालाही बजेटमध्ये खूप मोठा हिस्सा आहे.  महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे समजून घ्यायचं नाही. बजेटमध्ये महाराष्ट्र सर्वच ठिकाणी आहे. अजित पवारांनी बजेट थोडं बघण्याची गरज आहे. 
अजित पवारांना एवढंच विचारायचं आहे की,  बजेट प्रिपरेशनसाठी दोन वेळा बैठक झाली.


 अजित पवार येऊ शकले नाहीत. राज्यमंत्री देखील आले नाहीत.  त्यांना बजेटमध्ये काय रस होता.  तर  केवळ मेल पाठवला आणि नंतर केवळ एक अधिकार पाठवला.  त्यांनी बजेटमध्ये कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी जबाबदारी पाळली की नाही हे त्यांना विचारा असे देखील भागवत कराड म्हणाले.


 महाराष्ट्राचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही, आम्ही दिल्लीत आठ मंत्री बसलो आहे. मागच्या वर्षापेक्षा अडीच लाख कोटींनी बजेट वाढलं आहे. राहुल गांधी मोठे नेते पण बजेट वाचलेलं नाही.  क्रिप्टोकरन्सी 10 हजार कोटी गुंतवणूक झाल्याचा एक अंदाज होता.  ज्यांना उत्पन्न मिळालं त्यावर 30 टक्के कर लावण्याचा अंदाज आहे. 
भारत सरकारनं डिजीटल करन्सी आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे फायदे खूप आहेत, असे देखील   भागवत कराड म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या: