Budget 2021 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आर्थिक वर्ष 2021-22 साठी सकाळी अकरा वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. एखादी महिला अर्थमंत्री सलग तिसऱ्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा एक खास विक्रम आहे. सोबतच वेळेच्या हिशेबामी सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषणही निर्मला सीतारमण यांनी केलं आहे. एका अंतरिम बजेटसह मोदी सरकारचा हा नववा अर्थसंकल्प असेल. जाणून घेऊया वेळेच्या हिशेबाने कोणतं अर्थसंकल्पीय भाषण सर्वात मोठं होतं.


मागील वर्षी सर्वात मोठ्या भाषणाचा रेकॉर्ड मोडला
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये संसदेत अर्थसंकल्प सादर कराना दोन तास 39 मिनिटांचं भाषण केलं होतं, जे आतापर्यंतचं सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण आहे. त्याआधी 2019 मध्ये निर्मला सीतारमण यांनी दोन तास आठ मिनिटांचं भाषण केलं होतं. त्यावेळीही निर्मला सीतारमण यांनी रेकॉर्ड मोडला होता.


Union Budget 2021 LIVE Updates | अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरु, पंतप्रधान मोदी उपस्थित




ही आहेत सर्वात मोठी अर्थसंकल्पीय भाषणं!


साल 2020 - दोन तास 39 मिनिटे (निर्मला सीतारमण)
साल 2019 - दोन तास 8 मिनिटे (निर्मला सीतारमण)
साल 2003 - दोन तास 15 मिनिटे (जसवंत सिंह)
साल 2014 - दोन तास 10 मिनिटे (अरुण जेटली)


कोरोना काळ आणि दशकातील पहिला अर्थसंकल्प
एका अंतरिम बजेटसह मोदी सरकारचा हा नववा आणि या दशकातील पहिला अर्थसंकल्प आहे. देश कोविड-19 संकटातून बाहेर पडण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना हा अर्थसंकल्प सादर होत आहे. यामध्ये रोजगार आणि ग्रामीण विकासावरील खर्च वाढवण्याबाबत, विकास योजनांसाठी निधी, करदात्यांच्या हातात अधिक पैसा मिळावा, परदेशी गुंतवणूक आणि कर आकर्षित करण्यासाठी नियम सुलभ करण्याची अपेक्षा या अर्थसंकल्पातून आहे.