मुंबई: युक्रेन-रशिया युद्धसंकट आणि इंडोनेशियाच्या पामतेल निर्यातीच्या बंदीनंतर भारतात महागाईत वाढ झाली. खाद्यपदार्थांचे भाव गगनाला भिडले आहेत. याच पार्श्वभूमीवर कच्च्या मालाच्या किमतीमुळे आता गुड डे बिस्किट या प्रसिद्ध बिस्किट ब्रँडची निर्माती ब्रिटानियाने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा विचार सुरू केला आहे. यामुळे ब्रिटानियाची उत्पादने 10 टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतात.


गेल्या आर्थिक वर्षात ब्रिटानियाने आपल्या उत्पादनांच्या किमती 10 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. महागाई सातत्याने वाढत असल्यामुळे कच्च्या मालाची किंमत वाढल्याने कंपनीकडे आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही असं ब्रिटानिया कंपनीचे म्हणणं आहे..


कच्च्या मालामुळे अडचण
LiveMint.com या वृत्तसंस्थेने वृत्तानुसार अलीकडच्या काही दिवसांत गहू, खाद्यतेल आणि साखरेच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे पॅकेज्ड फूड कंपनीला त्यांच्या उत्पादनांच्या किमती आणखी वाढवाव्या लागतील असं ब्रिटानियाचे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी यांचं म्हणणं आहे. रुसो-युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या किमती वाढल्या आहेत आणि आता इंडोनेशियन पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी आल्याने खाद्यतेलही महाग झाले आहे


किंमती 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात
यापुढेही महागाई नियंत्रणात न आल्यास कंपनी आपली उत्पादने १० टक्क्यांनी महाग करू शकते. सध्या आपण अत्यंत कठीण काळातून जात आहोत. आम्ही दर महिन्याला परिस्थितीचा आढावा घेत आहोत. ग्राहकांवर जास्त बोजा पडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण प्रमुख वस्तूंच्या किमती वाढत राहिल्या तर आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागतील असं कंपनी प्रशासनाचं म्हणणं आहे.


भारत-युक्रेन आयात-निर्यातीच्या संकटामुळे पुरवठा खंडित झाल्यामुळे जगभरात गव्हाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा भारतावरही परिणाम झाला आहे. भारतीय गव्हाच्या निर्यातीच्या मागणीत अचानक वाढ झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात गव्हाचे दरही सरकारने जाहीर केलेल्या समर्थन मूल्याच्या वर गेले आहेत. तसेच इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर बंदी घातल्याने आधीच महागड्या खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: