Black Tomatoes Farming : अलीकडच्या काळात शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीतून भरघोस उत्पन्न घेतायेत. अनेकांनी ब्लॅक टोमॅटोचे (Black Tomatoes) नावही ऐकले नसेल. पण तुम्हाला माहीत आहे का, की हा टोमॅटो दिसायला काळा असला तरी यामध्ये विविध गुण आहेत. हे टोमॅटो खाल्ल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो. जाणून घेऊयात ब्लॅक टोमॅटोबद्दल सविस्तर माहिती.
ब्लॅक टोमॅटोमध्ये असलेल्या विविध गुणांमुळे त्याला भारतात मोठी मागणी आहे. देशातील अनेक शेतकरी आता पारंपरिक शेती पद्धतीऐवजी नवीन पिके आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. जर तुम्हालाही असे पीक घ्यायचे असेल ज्यामध्ये चांगला नफा मिळवता येईल, तर काळ्या टोमॅटोची शेती तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. कारण भारतात हळूहळू काळ्या टोमॅटोची मागणी वाढत आहे.
ब्लॅक टोमॅटो जास्त काळ ठेवता येतात
ब्लॅक टोमॅटो हे जास्त काळ ठेवता येतात. यामध्ये लाल टोमॅटोपेक्षा जास्त औषधी गुणधर्म आहेत. हे टोमॅटो बाहेरुन काळे आणि आतून लाल असतात. त्यांची चव फारशी आंबट किंवा गोडही नसते. हे खारट असतात जे कोलेस्ट्रॉल, वजन आणि साखरेची पातळी कमी करण्यासाठी वापरतात.
हे टोमॅटो पिकवण्यासाठी उबदार हवामान आवश्यक
काळ्या टोमॅटोची लागवड लाल टोमॅटोसारखीच आहे. हे टोमॅटो पिकवण्यासाठी उबदार हवामान आवश्यक आहे. भारतातील हवामान काळ्या टोमॅटोच्या लागवडीसाठी योग्य असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या शेतीसाठी जमिनीचे pH मूल्य 6-7 च्या दरम्यान असावे.
ब्लॅक टोमॅटो सुरुवात कुठं झाली?
ब्लॅक टोमॅटोची पहिली लागवड इंग्लंडमध्ये झाली. याला इंग्रजीत इंडिगो रोज टोमॅटो फार्मिंग असे म्हणतात. युरोपमध्ये त्याला सुपरफूड म्हणतात. भारतातही त्याची मागणी खूप वाढली आहे.
लागवड कोणत्या महिन्यापासून करता येते?
जर तुम्हालाही ब्लॅक टोमॅटोची लागवड करायची असेल, तर जानेवारी हा त्याच्या लागवडीसाठी सर्वोत्तम महिना मानला जातो. जानेवारीत लागवड केल्यास मार्च किंवा एप्रिलपर्यंत पीक तयार होते.
लागवडीसाठी किती खर्च? नफा किती?
ब्लॅक टोमॅटोच्या लागवडीचा खर्च लाल टोमॅटोएवढाच आहे. तुम्हाला फक्त बियाण्यांसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. या शेतीत खर्च कमी असून, हेक्टरी 4 ते 5लाख रुपये नफा मिळवता येतो. मोठ्या शहरांमध्ये विकून जास्त पैसे मिळवता येतात.
महत्वाच्या बातम्या: