Success Story: जयंती चौहान (Jayanti Chauhan) या देशातील सुप्रसिद्ध पाणी कंपनी बिस्लेरी इंटरनॅशनलच्या (Bisleri International) अध्यक्षा आहेत. या कंपनीचे संस्थापक रमेश चौहान यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने भारतातील पाण्याच्या बाजारपेठेत आपले स्थान मजबूत केलं आहे. आपल्या वडिलांच्या नंतर जयंती चौहान यांनी कंपनीचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला. आज जयंती शीतपेय क्षेत्रात मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांच्याशी स्पर्धा करत आहेत. तब्बल 7000 कोटींच्या व्यवसायिक साम्राज्याच्या त्या वारस आहेत. 


व्यापार जगतात अचानक हालचाली वाढल्या होत्या. टाटा समूह बिस्लेरी इंटरनॅशनल खरेदी करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्याचे एक कारण म्हणजे कंपनीचे संस्थापक रमेश चौहान यांचे वाढते वय आणि दुसरे त्यांची एकुलती एक मुलगी जयंती चौहान यांना कंपनी ताब्यात घेण्यात रस नव्हता. पण  टाटांसोबत बिस्लेरीचा करार होऊ शकला नाही. दरम्यानच्या काळात जयंती यांचेही मत परिवर्तन झाले. त्यांनी आपल्या वडिलांच्या नंतर कंपनीचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला. आज जयंती या शीतपेय क्षेत्रात मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांच्याशी स्पर्धा करत आहेत. 


जयंती चौहान या बिस्लेरी इंटरनॅशनलच्या प्रमुख 


जयंती चौहान या बिस्लेरी इंटरनॅशनलच्या प्रमुख आहेत. गेल्या वर्षी त्यांनी नवीन कार्बोनेटेड शीतपेये बाजारात आणण्याची घोषणा केली होती. हे तीन नवीन सब-ब्रँड म्हणजे रेव, पॉप आणि स्पायसी जीरा. तिन्ही कोला, ऑरेंज आणि जीरे श्रेणी पूर्ण करतात. याद्वारे बिस्लेरीच्या उत्पादनाची श्रेणी वाढवण्यात आली आहे. त्यात बिस्लेरी लिमोनाटा ब्रँड अंतर्गत कार्बोनेटेड पेये आधीच समाविष्ट आहेत. बिस्लेरीने या नवीन उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध डिजिटल आणि सोशल मीडिया मार्केटिंग मोहीम देखील सुरू केली आहे. जयंती चौहान या न्यूयॉर्क, दिल्ली आणि मुंबईत लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी लॉस एंजेलिसमधील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड मर्चेंडाइझिंग (FIDM) मधून पदवी प्राप्त केली. याव्यतिरिक्त, त्यांनी इस्टिटुटो मॅरांगोनी मिलानो येथून फॅशन स्टाइलिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून तिने फॅशन फोटोग्राफी आणि स्टाइलिंगमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे.


शीतपेय क्षेत्रात अंबानी आणि टाटांशी स्पर्धा 


बिस्लेरी शीतपेयांच्या बाजारपेठेत विस्तार होण्यापूर्वी, उद्योगपती मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्सने कॅम्पा कोला ब्रँड अंतर्गत स्वतःचे शीतपेय बाजारात आणण्याची योजना आखली होती. यामध्ये प्युअर ड्रिंक्स ग्रुपच्या अधिग्रहणाचा समावेश होता. बिसलरीच्या प्रवेशामुळे शीतपेय उद्योगात रिलायन्सला आव्हान मिळेल.
बिस्लेरीसोबतचा करार रद्द झाल्यानंतर, टाटा समूहाने टाटा कॉपर+ आणि हिमालयन सारख्या मिनरल वॉटर ब्रँड्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, 7,000 कोटी रुपयांच्या व्यवसाय साम्राज्याची एकमेव वारसदार जयंती चौहान यांची मुकेश अंबानींच्या रिलायन्स आणि रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील टाटा समूहाच्या कंपन्यांशी स्पर्धा सुरु आहे. 


महत्वाच्या बातम्या:


प्री-वेडिंग सेलिब्रेशनमधून मोठा व्यवसाय, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगसाठी किती खर्च?