Kanya Utthan Yojana: आर्थिक दुर्बल घटकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना चालवत आहे. या योजनांच्या माध्यमातून सरकार त्यांना आर्थिक मदत करते. मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबवल्या जातात. ज्या अंतर्गत तुमच्या मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा खर्च सरकार उचलला जातो. एक अशीच योजना म्हणजे मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना (Kanya Utthan Yojana). बिहार सरकारनं (Bihar government) ही योजना सुरु केलीय. या योजनेच्या माध्यमातून सरकार मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलत आहे. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती.   


जन्मापासून पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी सरकारकडून 94,100 रुपये दिले जातात


मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये सुकन्या समृद्धी योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, बालिका समृद्धी योजनांचा समावेश आहे. तसेच बिहार सरकार मुलींच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते पदवीपर्यंतचा खर्च सरकार उचलते. मुख्यमंत्री कन्या उत्थान योजनेअंतर्गत, मुलींच्या जन्मापासून पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी विविध टप्प्यांवर सरकारकडून 94,100 रुपये दिले जातात.


योजनेसंदर्भात अधिकची माहिती कुठे मिळेल?


तुम्हाला जर मुख्यमंत्री कन्या उत्थान योजनेसंदर्भात काही माहिती हवी असल्यास तुम्ही आयपीआरडी बिहार (माहिती आणि जनसंपर्क विभाग) च्या वेबसाइटला भेट देऊ शकता. याशिवाय तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 0612-2233333 वर कॉल करू शकता. तुम्हाला या योजनेशी संबंधित अधिक माहिती हवी असल्यास, तुम्ही अधिकृत वेबसाइट https://ekalyan.bih.nic.in/ वर जाऊन अर्ज करू शकता.


केव्हा किती रक्कम मिळणार? 


मुलीच्या जन्मानंतर 2000 पर्यंतची रक्कम दिली जाते.
1 वर्ष पूर्ण झाल्यावर 1000 रुपये दिले जातात.
लसीकरणासाठी 2000 रुपये दिले जातात.
इयत्ता 1 ते 12 च्या गणवेशासाठी 3700 रुपये दिले जातात.
दहावीच्या वर्गात 10,000 रुपये दिले जातात.
12वी मध्ये शिक्षणासाठी 25,000 रुपये दिले जातात.
यानंतर, महिलांना पदवी उत्तीर्ण झाल्यावर 50,000 रुपये दिले जातात.
याशिवाय, किशोरी आरोग्य योजनेंतर्गत, इयत्ता 7 वी ते 12 वीच्या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनसाठी दरवर्षी 300 रुपये दिले जातात.


योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?


या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बिहार राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत, मान्यताप्राप्त खासगी बँक किंवा बिहारमधील इंडिया पोस्टल पेमेंट बँकेत असले पाहिजे. कुटुंबातील दोन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.


महत्वाच्या बातम्या:


कर्ज घेण्यात परुषांपेक्षा महिला आघाडीवर, Gold Loan चं प्रमाण अधिक; घर खरेदीतही वाटा वाढला