Tax Collection : भारतीयासांठी एक दिलासादायक बातमी आहे. भारताच्या तिजोरीत मोठं भर पडली आहे. प्रत्यक्ष कर संकलनात (Tax collection) मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2023.24 मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलानाचा (Direct tax collection) आकडा 18,90,259 कोटी रुपयांच्या पुढे गेलाय. 17 मार्च 2024 पर्यंत ही वाढ झालीय. पाहुयात या संदर्भात सविस्तर माहिती 


मागील वर्षीच्या तुलनेत कर संकलनात 22.31 टक्क्यांची वाढ


17 मार्च 2024 पर्यंत प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ झालीय. 17 मार्चपर्यंत निव्वळ कर संकलनात 19.88 टक्क्यांची वाढ होऊन कस संकलन 18.90 कोटीच्या पुढे गेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये कॉर्पोरेट कराचा आकडा हा 9,14,469 कोटी रुपये आहे, तर वैयक्तीक आयकर हा 9,72,224 कोटी रुपये आहे. दरम्यान, मागील वर्षीचा विचार केला तर कर संकलनात यावर्षी मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कर संकलनात 22.31 टक्क्यांची एवढी मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कर संकलन हे 15,76,776 कोटी रुपये होते. 


कर धोरणातील सुधारणांमुळं कर संकलनात वाढ


प्रत्यक्ष कर संकलनात झालेल्या वाढीसंदर्भात बोलताना विविध तज्ज्ञ म्हणाले की, महसुलात झालेली 20 टक्क्यांची वाढ ही वर्षभर केलेल्या कर धोरणांच्या सुधारणांचा परिणाम आहे. कराच्या बाबतीत लोक अधिक जागृत होत आहेत. त्यामुळं दिवसेंदिवस कर संकलनात वाढ होत असल्याची माहिती काही तज्ज्ञांनी दिली आहे. दरम्यान, प्रत्यक्ष कराच्या बाबतीत, करदात्याकडून इतर कोणावर तरी भार टाकला जाऊ शकत नाही. हे मुख्यत्वे उत्पन्न किंवा संपत्तीवरील कर आहेत. आयकर, कॉर्पोरेशन कर, मालमत्ता कर, वारसा कर आणि भेट कर ही प्रत्यक्ष कराची उदाहरणे आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Income Tax : तुम्ही भरत असलेल्या इन्कम टॅक्स रिटर्नची माहिती योग्य आहे ना? ITR व्याज, लाभांशाची चुकीची माहिती देणारे आयकर विभागाच्या रडारवर