Gold Price : सोन्याची खरेदी (Gold) करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक दिवसानंतर आज सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी घसरण झालीय. त्यामुळं खरेदीदारांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याच्या दरात तब्बल 550 रुपयांनी घसरण झालीय, तर दुसरीकडं चांदीच्या दरातही जवळपास 550 रुपयांची घसरण झालीय.


सोन्याची खरेदी करणाऱ्यांना चांगली संधी 


देशातील मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये सोने आणि चांदीचे दर घसरले आहे. यामुळं सोन्याची खरेदी करणाऱ्यांना चांगली संधी मिळाली आहे. MCX वर देखील सोन्याचा जूनचा वायदा आज 571 रुपयांनी स्वस्त झाला असून तो 72156 रुपये प्रति 10 ग्रॅम या दरांवर आला आहे, तर दिवसभराच्या व्यवहारात तो 72414 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. तर चांदीचा जुलै वायदा 533 रुपयांनी स्वस्त होऊन 84377 रुपये किलो दरांवर आला आहे. 


कोणत्या शहरात सोन्याचा किती दर?


दिल्लीत 24 कॅरेट सोने 130 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तिथे 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 73,380 रुपये आहे. 
अहमदाबादमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोने 130 रुपयांनी स्वस्त होऊन 73,280 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
बंगळुरुमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोने 110 रुपयांनी स्वस्त होऊन 73,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
पाटणामध्ये 24 कॅरेट शुद्ध सोने 130 रुपयांनी स्वस्त होऊन 73,280 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
सूरतमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोने 130 रुपयांनी स्वस्त होऊन 73,280 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
विशाखापट्टणममध्ये 24 कॅरेट शुद्ध सोने 110 रुपयांनी स्वस्त होऊन 73,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
चेन्नईमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोने 280 रुपयांनी स्वस्त होऊन 73,360 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
हैदराबादमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोने 110 रुपयांनी स्वस्त होऊन 73,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
जयपूरमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोने 130 रुपयांनी स्वस्त होऊन 73,380 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
कोलकातामध्ये 24 कॅरेट शुद्ध सोने 110 रुपयांनी स्वस्त होऊन 73,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
लखनौमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोने 130 रुपयांनी स्वस्त होऊन 73,380 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.
मुंबईमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोने 110 रुपयांनी स्वस्त होऊन 73,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ 


गेल्या अनेक दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ होत आहे. यामुळं सर्वसामान्य ग्राहकांना सोन्याची खरेदी करणं परवड नाही. वाढत्या दरामुळं सोन्याची खरेदी करावी की नको? असा प्रश्न सर्वसामान्यांची मनात येत आहे. सध्या एका बाजूला लग्नसराईचा हंगाम सुरु आहे आणि दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात वाढ सुरु आहे. त्यामुळं सोने खरेदीवर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होत होते. अखेर सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झालीय. त्यामुळ खरेदीदारांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय. 


महत्वाच्या बातम्या:


सोनं फायद्याचं की तोट्याचं? ग्राहकांना फटका पण गुंतवणूकदारांना नफा, महिनाभरात गुंतवणूकदारांनी कमावले 396 कोटी