HDFC Bank FD:  एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एचडीएफसी बँकेने त्यांच्या एफडी ठेवीदारांना एक भेट दिली आहे. HDFC बँकेने एफडीवरील व्याजदर वाढवले ​​आहेत. नेमके किती व्याजदर वाढवले याबाबतच सविस्तर माहिती पाहुयात. 


HDFC बँकेत FD करणाऱ्या ग्राहकांना 7.75 टक्क्यांपर्यंत व्याजदर


एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे, कारण बँकेने त्यांच्या मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले ​​आहेत. हे नवे वाढलेले दरही आजपासून लागू झाले आहेत. या अंतर्गत HDFC बँकेत FD करणाऱ्या ग्राहकांना 7.75 टक्क्यांपर्यंत उत्कृष्ट व्याजदराची भेट मिळाली आहे. यामुळं HDFC बँकेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. ग्राहकांना यातून चांगला फायदा मिळणार आहे.


बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर व्याज वाढवले


एचडीएफसी बँक नेमके कोणत्या ग्राहकांना हा व्याजदर दिला असा प्रश्न तुम्हाला पडला असले. तर ज्या ग्राहकांची एफडी  2 कोटी रुपयांपेक्षा कमी पैशाची आहे, त्यांना हा वाढीव व्याजदराचा लाभ मिळणार आहे. एचडीएफसी बँकेने त्यांच्या एफडी दरांमध्ये 0.25 टक्के किंवा 25 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. हे नवीन दर आज 9 फेब्रुवारी 2024 पासून लागू झाले आहेत. HDFC बँकेने त्यांच्या वेबसाइटवर ही माहिती पोस्ट केली आहे.


कोणत्या मुदतीवर ठेवीदारांना जास्तीत जास्त व्याज मिळणार


18 महिने ते 21 महिन्यांच्या मुदत ठेवींवर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना कमाल 7.25 टक्के व्याज दिले जाणार आहे. याच कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज दिले जात आहे. दरम्यान, 5 वर्षे, 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वरही ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त व्याज दिले जात आहे. 5 वर्षे, 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर सामान्य गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त 7 टक्के व्याज मिळत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी 7.75 टक्के व्याज दिले जात आहे.


महत्वाच्या बातम्या:


HDFC बँकेचा ग्राहकांना 'दे धक्का', कर्जाचे व्याजदर वाढवले, जाणून घ्या कधीपासून आणि किती महाग झालं कर्ज