Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एसआयपी करताय? मग 'या' पाच चुका कधीच करून नका; नाहीतर होईल मोठा तोटा!
Mutual Funds SIP : एसआयपीच्या माध्यमातून चांगला परतावा मिळतो. बचतीचा आणि बचतीवर चांगला परतावा मिळवण्याचा एसआयपी हा उत्तम पर्याय आहे. मात्र एसआयपी करताना अनेकजण काही चुका करतात. ज्यामुळे त्यांना हवा तसा परतावा मिळत नाही. त्यामुळे एसआयपी करताना कोणत्या पाच चुका करू नयेत हे जाणून घेऊ या....
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएसआयी चालू करताना अगोदर रिसर्च करणे गरजेचे आहे. कोणताही रिसर्च न करता केलेल्या एसआयपीतून तुमचे नुकसान होण्याची शक्यता वाढते. तुम्हाला रिसर्च करणे शक्य नसेल तर आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.
एकदा एसआयपी चालू केल्यानंतर ती कधीही बंद पडू देऊ नका. मध्येच एसआयपी थांबवल्यामुळे तुम्हाला हवा असणारा परतावा मिळत नाही. त्यामुळे मध्येच एसआयपी करणे थांबवू नका. पैशांच्या गुंतवणुकीत सातत्य ठेवा.
अनेकदा मोठ्या परताव्याच्या हव्यासापोटी अनेकजण मोठ्या रकमेची एसआयपी चालू करतात. मात्र भविष्यात आर्थिक अडचण निर्माण झाल्यास मोठ्या रकमेची ही एसआयपी चालू ठेवणे अशक्य होऊ शकते. त्यामुळेच मोठ्या रकमेची एसआयपी करण्यापेक्षा कमी रकमेची एसआयपी करून ती बंद पडू देऊ नये.
एसआयपी ही शेअर बाजाराशी लिंक असलेली गुंतवणूक पद्धत आहे. त्यामुळे तत्कालीन चढ-उतार पाहून घारबून जाऊ नये. एसआयपी करातना दीर्घकालीन गुंतवणूक समोर ठेवावी.
तुम्ही गुंतवणूक करत असलेली रक्कम कोणत्याही एकाच फंडात गुंतवू नये. तुमच्या पोर्टफोलिओत विविधता ठेवावी. एसआयपी करताना स्मॉल कॅप, मिड क्रप, लार्ज कॅप अशा वेगवेगळ्या फंडांत गुंतवणूक करावी.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
सांकेतिक फोटो