Multibagger Stock: गुंतवणुकीसाठी तुम्ही जबरदस्त रिटर्न्स देणाऱ्या स्टॉकच्या शोधात असाल तर GRM Overseas हा शेअर योग्य पर्याय ठरू शकतो. या कंपनीकडून बासमती तांदळाची निर्यात केली जाते. ही कंपनी भारतातील FMCG क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या काही काळात या कंपनीत प्रमोटर्स तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) आपली गुंतवणूक वाढवलेली आहे.
0.38 टक्क्यांनी किरकोळ घसरण
GRM Overseas या कंपनीने नुकतेच बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान याला सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसिडर) म्हणून करारबद्ध केलेले आहे. गेल्या शुक्रवारी मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये 0.38 टक्क्यांनी किरकोळ घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 262.80 रुपये होते. या कंपनीचे बाजार भांडवल 1576.80 कोटी रुपये आहे.
FII तसेच प्रमोटर्सने वाढवली गुंतवणूक
जून 2024 तिमाहीपर्यंत प्रमोटर्सने या कंपनीचे 73,000 शेअर्स खरेदी केले. ज्यामुळे प्रमोटर्सची या कंपनीतील हिस्सेदारी 72.29 टक्क्यांपर्यंत वाढली. मार्च 2024 पर्यंत ही हिस्सेदारी 72.16 टक्के होती. यासह परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनाही या कंपनीतील आपली गुंतवणूक वाढवलेली आहे. गुंतवणुकीचे हे प्रमाण 0.67 टक्क्यंपर्यंत वाढली आहे. मार्च 2024 पर्यंत ही हिस्सेदारी 0.26 टक्के होती. या कंपनीची 27.05 टक्के मालकी ही जनतेकड आहे.
GRM Overseas शेअरचा ROE 18.3 टक्के आणि ROCE 12.9 टक्के आहे. कंपनीचा डेट-टू-इक्विटी रेशो 1.28 आहे. या शेअरचे PE प्रणाण 30.5 रुपये आहे. या कंपनीत प्रमोटर्सच्या गुंतवणुकीचे प्रमाण चांगलेच आहे. त्यामुळे ही एक सकारात्मक बाब म्हणायला हवी.
तिमाही निकालात नेमकं काय?
या कंपनीच्या तिमाही निकालाचा विचार करायचा झाला तर Q1FY25 मध्ये या कंपनीने 18 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवलेला आहे. गेल्या वर्षाच्या याच तिमाहीत हे प्रमाण 17.4 कोटी रुपयांनी अधिक आहे. कंपनीच्या मिळकतीत 15 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. 30 जून 2024 पर्यंत या कंपनीचा महसूल 370 कोटी रुपयांपर्यंत वाढला होता. गेल्या वर्षात याच काळात कंपनीचा महसूल 320 कोटी रुपये होता.
GRM Overseas ने दिले 262,800 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स
गेल्या एका महिन्यात GRM Overseas या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांनी परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत परताव्याचे हे प्रमाण 47 टक्के आहे. वर्षभराची तुलना करायची झाल्यास हा परतावा 37 टक्के आहे. गेल्या पाच वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना 2128 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. वीस वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 262,800 टक्के महारिटर्न्स दिले आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
जन्माष्टमीला शेअर बाजार बंद असेल का? जाणून घ्या 26 ऑगस्टला स्टॉक मार्केट बंद की चालू?
महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या 'लखपती दीदी' योजना आहे तरी काय?