मुंबई: बीसीपीएल रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर चर्चेत राहण्याची शक्यता आहे. या कंपनीला पूर्व रेल्वेच्या हावडा विभागाकडून 25 केव्ही ओव्हरहेड उपकरण (OHE) कामासाठी नवी ऑर्डर मिळाली आहे, असं कंपनीनं सांगितलं आहे.  करारामध्ये हावडा विभागांतर्गत जुन्या गाई रॉड असेंब्लीच्या बदलाचा समावेश आहे. कंपनीला प्रकल्पासाठी स्वीकृती पत्र मिळाले आहे, त्याची एकूण किंमत रु. 47.23 दशलक्ष (अंदाजे रु. 4.72 कोटी) आहे. प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी 18 महिन्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

कंपनीचे चेअरमन काय म्हणाले?

कंपनीचे चेअरमन अपरेश नंदी यांसंदर्भात माहिती देताना म्हणाले की, “बीसीपीएल रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड द्वारे आम्ही आमच्या भागधारकांना हावडा विभागाच्या 'जुन्या गाई रॉड असेंब्लीच्या बदलाच्या' संदर्भात 25 केव्ही ओएचई कामासाठी ऑर्डर मिळाल्यासंदर्भात माहिती देतांना आनंद होतोय. या ऑर्डरची किंमत रु. 47.23 दशलक्ष आहे आणि आम्ही येत्या काही महिन्यांत ऑर्डरच्या पुढील प्रक्रियेबाबत खूप आशावादी आहोत“

अपरेश नंदी म्हणाले की  BCPLनं देशाच्या विविध भागांना, विशेषतः ईशान्य आणि ग्रामीण भागांना जोडण्यासाठी आमच्या अतुलनीय सेवांची दिल्या आहेत. भविष्यात भारतीय रेल्वे क्षेत्रात सेवा देत राहण्याचा आत्मविश्वास आहे. आम्ही संपूर्ण भारतभर अशाच प्रकल्पांबद्दल खूप आशावादी आहोत. रेल्वेच्या कामांचा ओघ सुरु असून त्यात EPC ऑर्डर, सुधारणा काम, नवीन लाईन टाकणे, विद्यमान रेल्वे ट्रॅकवर तिसरी आणि चौथी लाईन जोडणे, विद्यमान रेल्वे लाईनच्या वेगात वाढ करणे यांचा समावेश आहे आणि आम्ही आशावादी आहोत की भविष्यात कामांच्या कमतरता भासणार नाही.” 

Continues below advertisement

BCPL Railway Infrastructure Ltd बद्दल 

BCPL Railway Infrastructure Ltd ही एक पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी कंपनी आहे. रेल्वे विद्युतीकरण आणि संबंधित EPC (अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम)  कामांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे. कंपनी प्रामुख्याने रेल्वे विद्युतीकरण प्रकल्पांसाठी ओव्हरहेड उपकरणे (OHE) कामांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करते, ज्यामध्ये भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये वापरल्या जाणार्‍या 25 KV ट्रॅक्शन सिस्टमची स्थापना, सुधारणा आणि देखभाल यांचा समावेश आहे. 

BCPLशेअरची कामगिरी

BCPL Railway Infrastructure Ltd च्या शेअरची किंमत 77.05 रुपये होती, 0.90 अंकांनी किंवा 1.15 टक्क्यांनी कमी झाली. बीसीपीएल शेअर 76.69 रुपयांवर शुक्रवारी बंद झाला.   गेल्या एका वर्षात स्टॉक 18.06 टक्क्यांनी घसरला आहे आणि गेल्या दोन वर्षांत 11.32 टक्क्यांनी घसरला आहे. तथापि, तीन वर्षांच्या कालावधीत, त्याने 72.60 टक्के नफा दिला आहे.

अस्वीकृती: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे आणि गुंतवणूक सल्ला नाही.