Nashik Vidhan Parishad Election 2026: राज्यातील विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election) रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात (Nashik Vidhan Parishad Election 2026) महायुतीसमोरील (Mahayuti) अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या विरोधात भाजपच्या दोन नेत्यांनी बंडखोरीचे निशाण फडकवले आहे. यातच आता भाजपचे मालेगावचे बंडखोर नेते प्रसाद हिरे (Prasad Hire) यांनी थेट भाजप कार्यालयात जात, "मला माघार घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मंत्री गिरीश महाजन यांनी कोणतीही सूचना दिली नाही," असा धक्कादायक खुलासा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

Prasad Hiray: हा माझाच पक्ष, मी माघार घेतलेली नाही: प्रसाद हिरे

प्रसाद हिरे यांनी थेट भाजप कार्यालयात हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना हिरे म्हणाले, "हा माझा पक्ष आहे आणि हे माझे कार्यालय आहे. यासाठीच मी भाजप शहराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी येथे आलो होतो. मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही, माझा विजय नक्की आहे."

ते पुढे म्हणाले की, "मी माघार घ्यावी यासाठी मला मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) किंवा अन्य कोणीही अद्याप सूचना दिलेली नाही. मी गिरीश महाजन यांची भेट घेणार आहे, त्यानंतर ते जे काही आदेश (Orders) देतील त्यावर पुढील योग्य तो निर्णय घेऊ."

Continues below advertisement

Nashik Vidhan Parishad Election 2026: महायुतीला बंडखोरीचे वादळ शमवण्यात अपयश

दुसरीकडे, अपक्ष उमेदवार गोकुळ गीते (Gokul Gite) यांनीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे महायुतीला मोठा हादरा बसला आहे. बंडखोरीचे हे वादळ शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांना अपयश आले आहे. सध्या हे दोन्ही नेते गोकुळ गीते यांची मनधरणी करून त्यांचा जाहीर पाठिंबा मिळवण्याची रणनीती आखत आहेत. मात्र, गोकुळ गीतेंनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत, "जाहीर पाठिंबा देण्याचा विषयच येत नाही, निवडणूक खूप पुढे गेली आहे," अशा कडक शब्दांत महायुतीला सुनावले आहे.

Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिकमध्ये तिरंगी लढत 

महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाला (Shiv Sena Shinde Faction) सुटल्यामुळे गोकुळ गीते यांचे बंधू आणि भाजपचे नेते गणेश गीते (Ganesh Gite) यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत माघार घेतली. मात्र, गोकुळ गीते स्वतः रिंगणात कायम आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात गोकुळ गीते आणि भाजपचे प्रसाद हिरे असा अटीतटीचा तिरंगी सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Gokul Gite: 'माझ्यावर दबाव आणू नये', गोकुळ गीतेंचा आरोप

आपल्या उमेदवारीवर ठाम असण्याचे कारण सांगताना गोकुळ गीते म्हणाले की, "नरेंद्र दराडे यांचे सुपुत्र कुणाल दराडे यांनी फोनवरून दिलेल्या अर्वाच्च भाषेतील धमकीमुळे मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. समोरच्या उमेदवाराच्या मुलाने माझा बाप काढला, त्यामुळे मला उमेदवारी करणे क्रमप्राप्त आहे. 

महायुतीचे उमेदवार हे क्रियाशील नसून निष्क्रिय आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. "या निष्क्रिय उमेदवारासाठी भाजप युतीचे नेते माझ्यावर दबाव आणत आहेत, माझी विनंती आहे की त्यांनी माझ्यावर दबाव आणू नये," असे आवाहन त्यांनी नेत्यांना केले आहे. आपला प्रचार सुरू झाला असून सर्वाधिक नगरसेवक आपल्यासोबत येतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केल्याने नाशिकमधील राजकीय संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...