Bank News : बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मार्चला रविवार येत आहे. तरीदेखील या दिवशी बँका सुरु राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (Reserve Bank of India) याबाबतचे परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये रविवारी बँका सुरु ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 


रात्री उशीरापर्यंत बँकांचे कामकाज चालणार 


आर्थिक वर्ष संपायला अवघे काहीच दिवस राहिले आहेत. 31 मार्चला आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळं वर्षाच्या शेवटच्या दिवशी बँकांना भरपूर काम असणार आहे. त्यामुळं 31 मार्चला बँका सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, 31 मार्चला रात्री उशीरापर्यंत बँकांचे कामकाज चालणार आहे. मात्र, यादिवशी रात्री उशीरापर्यंत बँकांचे सार्वजनिक व्यवहार होणार नाहीत. 


बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी दिलासा


दरम्यान, बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी रविवारी बँका सुरु राहणार ही दिलासादायक बातमी आहे. आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असल्यामुळं बँका सुरु राहणार आहेत. दरम्यान, RBI ने निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्चला भारत सरकारशी संबधीत असणाऱ्याच सर्व बँका सुरु राहणार आहेत. या दिवशी सर्व बँका खुल्या असल्यामुळं वर्षातील आर्थिक व्यवहार सगळे पूर्ण होतील असं RBI ने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशात 1 एप्रिल ते 31 मार्च असे आर्थिक वर्ष आहे. दरम्यान, मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच होळीचा सण आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी या दिवशी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं या आठवड्यात बँका कामकाज पूर्ण करण्यासाठी खूप कमी वेळ मिळत आहे. त्यामुळं रविवारी बँका सुरु राहणार आहेत.


1 एप्रिलला बँका राहणार बंद 


31 मार्चला रात्री उशीरापर्यंत कर्मचारी बँकांमध्ये काम करणार आहेत. कारण, संपूर्ण आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय बँका आपलं कामकाज पूर्ण करणार नाहीत. त्यामुळं 1 एप्रिलच्या दिवशी सोमवारी र्व बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय देखील RBI ने घेतला आहे. याबाबतची माहिती RBI च्या परिपत्रकात देण्यात आली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


'या' 5 सार्वजनिक बँकांबाबत सरकार घेणार मोठा निर्णय? तुमचं खातं कोणत्या बँकेत?