Share Market Closing Bell: भारतीय शेअर बाजार आज किंचीत तेजीसह बंद झाला. शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली होती. मात्र, त्यानंतर बाजारात विक्रीचा दबाव वाढू लागल्याने सेन्सेक्स (Sensex), निफ्टी (Nifty) निर्देशांकात घसरण दिसून आली. बँकिंग स्टॉक्सने (Banking Stocks) बाजार काही प्रमाणात सावरला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 91 अंकांनी वधारत 61,510 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 23 अंकांनी वधारत 18,267 अंकांवर बंद झाला.
आज शेअर बाजारात मेटल्स, आयटी, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू वगळता इतर सर्व सेक्टरमधील शेअरमध्ये तेजी दिसून आली. बँकिंग, ऑटो, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, फार्मा, मीडिया आदी सेक्टरमधील शेअर्स तेजीत बंद झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधील शेअर्स तेजी दिसून आली.
बँक निफ्टी 272 अंकांनी वधारत 42,729 अंकांवर बंद झाला. निफ्टी 50 मधील 25 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 25 कंपन्यांच्या शेअर्स दरात घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 14 शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 16 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
आज बाजारात एसबीआय 1.44 टक्के, बजाज फायनान्स 1.43 टक्के, डॉ. रेड्डीज लॅबच्या शेअर दरात 1.31 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय, कोटक महिंद्रा 0.85 टक्के, सन फार्मा 0.76 टक्के, मारुती सुझुकी 0.74 टक्के, एनटीपीसी 0.60 टक्के, अॅक्सिस बँक 0.55 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.45 टक्के, एचडीएफसी 0.43 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले.
आज, पॉवरग्रीडच्या शेअर दरात 1.08 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर, टेक महिंद्राच्या शेअर दरात 0.66 टक्के, भारती एअरटेल 0.54 टक्के, बजाज फिनसर्व 0.51 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.50 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, एचयूएलच्या शेअर दरात 0.45 टक्क्यांची घसरण दिसून आली. त्याशिवाय, रिलायन्स, नेस्ले, टीसीएस आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफावसुली दिसून आली.
तेजीसह बाजाराची सुरुवात
भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 360.75 अंकांनी वधारत 61,779.71 अंकांवर खुला होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 81 अंकांच्या तेजीसह 18,325.20 अंकाच्या पातळीवर खुला झाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: