Weekly Horoscope 23 To 29 June 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होतोय. हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. त्यामुळे जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य(Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास साप्ताहिक राशीभविष्य (Aries Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - मेष राशीच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास, नवीन आठवड्यात तुमच्या पार्टनरबरोबर तुमचा चांगला संवाद राहील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या पार्टनरबरोबर खुश असाल. कोणतेच मतभेद होणार नाहीत.
करिअर (Career) - मेष राशीच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्हाला तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं लागेल. कामावरचा वर्क लोड कमी करा. अनेक आव्हानं देखील समोर येतील. त्याचा सामना करा.
आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. पैशांचा जपून वापर कराल आणि पैशांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहणार नाही. तसेच, तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा.
आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुमची एनर्जी चांगली राहील. या दरम्यान सकस आणि निरोगी आहार घ्या. तसेच, शरीराला व्यायामाचीही गरज आहे. त्यामुळे नियमित योग आणि व्यायाम करा.
वृषभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Taurus Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात तुमची चिडचिड तसेच मानसिक त्रास कमी होईल. पार्टनरला पुरेसा वेळ देण्यास प्रयत्न करा. तसेच, प्रवासाला जाण्याचे योगदेखील जुळून येणार आहेत.
करिअर (Career) - जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. या आठवड्यात तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. तुमचा दृष्टीकोन चांगला असेल.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, पैशांच्या बाबतीत स्मार्ट विचार करा. कोणालाही पैशांची मदत करताना 10 वेळा विचार करा. तसेच, व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, हेल्दी आहार घ्या. तसेच, निरोगी जीवनशैली फॉलो करा. तसेच, नियमित जीवनशैली फॉलो करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
