नवी दिल्ली : आता ऑगस्ट महिन्याचे अखेरचे काही दिवस शिल्लक आहेत. ऑगस्ट महिन्यात गोपाळकाला आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी हे सण काही दिवसांवर आले आहेत.सप्टेंबर महिन्यापासून देशभरासह राज्यात विविध सणांची सुरुवात होणार आहे. सप्टेंबर महिन्यातील सण उत्सवांमुळं बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळं ज्यांचं बँकांमध्ये काम  असेल त्यांनी नेमकी सुट्टी कधी असणार आहे याची माहिती ठेवणं आवश्यक आहे. सुट्टीच्या दिवसापूर्वी कामं करुन घेणं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेली सुट्ट्यांची यादी जाणून घेऊया.


सप्टेंबर महिन्यात आठ दिवस बँका बंद राहणार


सप्टेंबर महिन्यातील सण उत्सव, शनिवार आणि रविवार असं मिळून एकूण 8 दिवस बंका बंद राहणार आहेत. या दिवशी सार्वजनिक कार्यालयं आणि खासगी कार्यालयांना देखील सुट्ट्या असू शकतात. काही राज्यांमध्ये वेगवेगळ्या सणांमुळं वेगळ्या दिवशी बँका बंद राहू शकतात. 


सप्टेंबर महिन्यात बँकांना सुट्टी कधी असेल?


1 सप्टेंबर 2024 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
7 सप्टेंबर 2024 : गणेश चतुर्थी(काही राज्यांमध्ये सुट्टी)
8 सप्टेंबर 2024 : रविवार (साप्ताहिक सुट्टी )    
14 सप्टेंबर 2024: दुसरा शनिवार 
15 सप्टेंबर 2024 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
16 सप्टेंबर 2024 : ईद-ए- मिलाद (काही राज्यांमध्ये सुट्टी)
22 सप्टेंबर 2024 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
28 सप्टेंबर 2024 :चौथा शनिवार
29 सप्टेंबर 2024 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)


सप्टेंबर महिन्यातील प्रमुख सण


सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवासारखा प्रमुख सण साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सव काळात बँका किती दिवस बंद राहणार हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. गणेशोत्सव 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थीपासून सुरु होणार आहे. त्या दिवशी बँकांना सुट्टी असेल. त्यानंतर रविवारी साप्ताहिक सुट्टी 8 सप्टेंबरला असेल. त्यामुळं बँका सलग दोन दिवस बंद राहतील. पुढच्या आठवड्यात दुसरा शनिवार  14 सप्टेंबर रोजी आहे, साप्ताहिक सुट्टी म्हणजेच रविवारी 15 सप्टेंबरला आणि 16 सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सुट्टी असेल. म्हणजेत सलग तीन दिवस बँका बंद राहतील.


महाराष्ट्रात बँकांना किती दिवस सुट्टी असणार?


महाराष्ट्रात वर नमूद केल्या प्रमाणं आठही दिवस बँका बंद असणार आहेत. चार रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार यासह गणेश चतुर्थी आणि ईद-ए- मिलादची सुट्टी असेल. त्यामुळं महाराष्ट्रातील बँक ग्राहकांनी यांची नोंद घेणं आवश्यक आहे. 


संबंधित बातम्या :  


Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेसाठी किती महिला पात्र? आत्तापर्यंत किती अर्ज प्राप्त? सविस्तर माहिती एका क्लिकवर


Disapproved अर्जाबाबत मोठी अपडेट! लाखो लाडक्या बहिणींना मिळणार 4500 रुपये; फक्त 'ही' एक गोष्ट करण्याचं सरकारचं आवाहन!