Bank Holidays in December 2022 : नोव्हेंबर (November) महिना संपून डिसेंबर (December) महिना सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना जर बॅंकेत काही महत्वाची कामं असतील तर आताच उरकून घ्या. कारण डिसेंबर महिन्यात 13 दिवस बॅंका बंद (December Bank Holidays) राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद (December Bank Holidays) असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे.  


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार डिसेंबरमध्ये एकूण 13 दिवस बँक सुट्टी (December Bank Holidays) असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय (RBI) 3 आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित आहे.


सुट्ट्यांची संपूर्ण यादी (Bank Holidays List in December 2022) :


3 डिसेंबर 2022 : शनिवार, सेंट फ्रान्सिस झेव्हियर, पणजी गोवा


4 डिसेंबर 2022 : रविवार (साप्ताहिक सुट्टी) 


10 डिसेंबर 2022 : शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार) 


11 डिसेंबर 2022 : रविवार (साप्ताहिक सुट्टी) 


12 डिसेंबर 2022 : सोमवार, पा-तोगन नेंगमिंजा संगमा, शिलॉंग


18 डिसेंबर 2022 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)


19 डिसेंबर 2022 : सोमवार गोवा लिब्रेशन डे, पणजी गोवा


24 डिसेंबर 2022 : शनिवार, महिन्याचा चौथा शनिवार, देशभर


25 डिसेंबर 2022 : रविवार (साप्ताहिक सुट्टी) आणि ख्रिसमस


26 डिसेंबर 2022 : सोमवार, लोसूंग/नामसूंग, एजावल (शिलॉंग)


29 डिसेंबर 2022 : गुरुवार, गुरु गोविंद सिंग जयंती, चंदीगड


30 डिसेंबर 2022 : शुक्रवार, यू कियांग नांगबाह, शिलांग


31 डिसेंबर 2022 : शनिवार, न्यू ईयर ईव्ह, देशातील काही भागात


वरील नमूद केलेल्या दिवसांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांनुसार लागू होणार आहेत. या बॅंकेच्या सुट्ट्या असल्या तरी खातेधारकांनी बॅंकेचे काही काम करण्यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरू शकतात. तुम्ही या सुट्ट्यांचा मागोवा ठेवल्यास, तुम्ही बँकेच्या व्यवहाराची अधिक चांगल्या पद्धतीने योजना करू शकाल. लाँग वीकेंडसाठी, तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचे उत्तम नियोजन देखील करू शकता.


महत्वाच्या बातम्या : 


Tata Bisleri Deal: बिस्लेरी 'टाटा'च्या मालकीची होणार? 'या' कारणासाठी होतेय कंपनीची विक्री