Bank Holiday List : नवीन वर्ष (New Year 2023) सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक सुरू होणार आहे. 2024 मध्ये शनिवार (Saturday) आणि रविवार (Sunday) वगळता अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. तुमचीही बँकेसंबंधित काही कामे करायची असतील तर पुढच्या वर्षी येणाऱ्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी एकदा तपासून पाहा. रिझर्व्ह बँकेने 2024 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. संपूर्ण वर्षात 50 दिवस बँका बंद राहणार आहे, त्यामुळे सुट्ट्यांची यादी पाहा आणि त्यानुसार तुमच्या कामांचं नियोजन करा.
2024 वर्षात 'हे' दिवस बँका बंद
1 जानेवारी 2024 : देशभरात बँका बंद राहतील.
11 जानेवारी 2024 : मिझोराममध्ये मिशनरी डेनिमित्त बँका बंद आहेत.
12 जानेवारी 2024 : स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील.
13 जानेवारी 2024 : दुसरा शनिवार आणि लोहरीमुळे बँका बंद राहतील.
14 जानेवारी 2024 : मकर संक्रांती आणि रविवारमुळे देशातील अनेक राज्यांमधील बँकांना सुट्टी असेल.
15 जानेवारी 2024 : तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पोंगलमुळे बँका बंद राहतील.
16 जानेवारी 2024 : पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये तुसू पुजेमुळे बँका बंद राहतील.
17 जानेवारी 2024 : गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त अनेक राज्यांतील बँकांना सुट्टी असेल.
23 जानेवारी 2024 : नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
25 जानेवारी 2024 : हिमाचल प्रदेश राज्य दिनानिमित्त राज्यात सुट्टी असेल.
26 जानेवारी 2024 : प्रजासत्ताक दिनानिमित्त बँकांना सुट्टी असेल.
31 जानेवारी 2024 : मी-डॅम-मी-फीमुळे आसाममध्ये सुट्टी असेल.
15 फेब्रुवारी 2024 : मणिपूरमध्ये Lui-Ngai-Ni मुळे बँका बंद राहतील.
19 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्रातील बँकांना शिवाजी जयंतीनिमित्त सुट्टी असेल.
8 मार्च 2024 : महाशिवरात्रीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
25 मार्च 2024 : होळीनिमित्त बँका बंद राहणार आहेत.
29 मार्च 2024 : गुड फ्रायडेमुळे देशभरात बँकांना सुट्टी असेल.
9 एप्रिल 2024 : कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात उगादी/गुढीपाडव्याला बँका बंद राहणार आहेत.
10 एप्रिल 2024 : ईद-उल-फित्रमुळे बँका बंद राहतील.
17 एप्रिल 2024 : रामनवमीनिमित्त बँकांना सुट्टी असेल.
1 मे 2024 : अनेक राज्यांमध्ये कामगार आणि महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी असेल.
10 जून 2024 : श्रीगुरु अर्जुन देवजी शहीद दिनानिमित्त पंजाबमध्ये बँक असेल.
15 जून 2024 : मिझोरममध्ये YMA दिनानिमित्त बँका बंद राहतील.
6 जुलै 2024 : मिझोरममध्ये MHIP डे मुळे बँका बंद राहतील.
17 जुलै 2024 : मोहरमनिमित्त बँकांना सुट्टी असेल.
31 जुलै 2024 : शहीद उधम सिंह शहीद दिनानिमित्त हरियाणा आणि पंजाबमधील बँकांना सुट्टी असेल.
15 ऑगस्ट 2024 : स्वातंत्र्य दिनानिमित्त बँकांना सुट्टी असेल.
19 ऑगस्ट 2024 : रक्षाबंधनामुळे बँका बंद राहतील.
26 ऑगस्ट 2024 : जन्माष्टमीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
7 सप्टेंबर 2024 : गणेश चतुर्थीनिमित्त महाराष्ट्रात बँका बंद राहतील.
13 सप्टेंबर 2024 : राजस्थानमध्ये रामदेव जयंती, तेजा दशमीला बँका बंद राहतील.
16 सप्टेंबर 2024 : ईद-ए-मिलादनिमित्त अनेक राज्यांमध्ये सुट्टी असेल.
17 सप्टेंबर 2024 : इंद्र जत्रेमुळे सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.
18 सप्टेंबर 2024 : नारायण गुरु जयंतीनिमित्त केरळमध्ये सुट्टी असेल.
21 सप्टेंबर 2024 : नारायण गुरु समाधीनिमित्त केरळमध्ये सुट्टी असेल.
23 सप्टेंबर 2024 : हरियाणामध्ये शूरवीरांच्या शहीद दिनानिमित्त बँका बंद राहतील.
2 ऑक्टोबर 2024 : गांधी जयंतीनिमित्त देशभरातील बँका असतील.
10 ऑक्टोबर 2024 : महा सप्तमीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
11 ऑक्टोबर 2024 : महाअष्टमीमुळे बँका बंद राहतील.
12 ऑक्टोबर 2024 : दसऱ्यानिमित्त बँका बंद राहतील.
31 ऑक्टोबर 2024 : सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त गुजरातमध्ये बँका बंद राहतील.
1 नोव्हेंबर 2024 : कुट, हरियाणा दिन, कर्नाटक राज्योत्सवासाठी अनेक राज्यांमध्ये सुट्टी असेल.
2 नोव्हेंबर 2024 : निंगोल चकौबा मणिपूरमध्ये बँक बंद राहील.
7 नोव्हेंबर 2024 : छठ पूजेमुळे बिहार आणि झारखंडमध्ये बँका बंद राहतील.
15 नोव्हेंबर 2024 : गुरु नानक जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.
18 नोव्हेंबर 2024 : कर्नाटकात कनक दास जयंतीला सुट्टी असेल.
25 डिसेंबर 2024 : नाताळनिमित्त सुट्टी असेल.