Bangladesh Violence: भारताच्या (India) शेजारील देश असणाऱ्या बांगलादेशमध्ये सध्या हिंसाचार (Bangladesh Violence) सुरु आहे. या राजकीय संघर्षामुळं पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी राजीनामा देत देश सोडला आहे. गेल्या दोन तीन दिवसात हिंसाचारात 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हिंसाचारग्रस्त बांगलादेशशी भारताचे मोठे व्यापारी संबंध आहेत. दोन्ही देश अनेक जीवनावश्यक वस्तूंची आयात-निर्यात करतात. बांगलादेशातून भारतात काय येते? भारतातून बांगलादेशात काय निर्यात होते? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.


हिंसाचारामुळे कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय प्रभावित 


बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराचा भारतासोबतच्या व्यापारावरही परिणाम झाला आहे. एका अहवालानुसार, दररोज 150 कोटींहून अधिक रुपयांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. पेट्रापोल आणि बेनेपोल सीमेवरून दोन्ही देशांमध्ये सुमारे 30,000 कोटी रुपयांचा वार्षिक व्यापार होतो. जो गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प आहे.


भारत हा बांगलादेशचा दुसरा सर्वात मोठा निर्यातदार देश


भारत हा बांगलादेशचा दुसरा सर्वात मोठा निर्यात भागीदार आहे. जर आपण भारत आणि बांगलादेशमधील व्यापाराचा तपशीलवार विचार केला तर, ibef.org वर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, बांगलादेश हा भारताचा प्रमुख व्यापारी भागीदार आहे. तर दुसरा सर्वात मोठा निर्यात भागीदार आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील एकूण व्यापार 14.22 अब्ज डॉलर होता. FY23 मध्ये भारतातून बांगलादेशला 6,052 वस्तूंची निर्यात करण्यात आली आहे. हा निर्यातीचा आकडा 12.20 अब्ज डॉलर होता. जो FY22 मध्ये 16.15 बिलियन डॉलरपेक्षा कमी होता.


भारतातून बांगलादेशला पाठवलेल्या  जाणाऱ्या प्रमुख वस्तू (FY 2023)


वस्तू                             किती रुपयांचा होतो व्यापार 


सूती धागा                             1.02 अब्ज डॉलर
पेट्रोलियम उत्पादने                  816 दशलक्ष डॉलर
तांदूळ                                   556 दशलक्ष डॉलर
सूती कपडे                             541 दशलक्ष डॉलर
सेंद्रिय आणि अजैविक रसायने    430 दशलक्ष डॉलर


बांगलादेशातून भारतात आयात होणार माल? 


RMG कापूस                       510 दशलक्ष डॉलर 
सुती कपडे                           153 दशलक्ष डॉलर
RMG मानवनिर्मित फायबर     142 दशलक्ष डॉलर
मसाले                                  125 दशलक्ष डॉलर
ज्यूट                                     103 दशलक्ष डॉलर