Banana crop damaged for Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात उजनी धरणाच्या (Ujani Dam) परीसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेषत: केळीच्या बागा (Banana crop) जमिनदोस्त झाल्या आहेत. यामुळं शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. 


करमाळा तालुक्याला मोठा फटका, 15 ते 20 कोटी रुपयांचे नुकसान


सध्या वादळी वारे आणि अवकाळीचा सर्वात जास्त फटका उजनी जलाशयाच्या काठावर असणाऱ्या केळी बागांना बसला आहे. अनेक ठिकाणी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. उजनी जलाशयाच्या काठावर असणाऱ्या चिखलठाण परिसरात खूप मोठे नुकसान झाले आहे. येथील विकास राजाराम वाघमोडे यांची चार एकर केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे. तर शेतकरी नवनाथ कोंडीबा मारकड यांची पाच एकर क्षेत्रावरी केळीची बाग आडवी झाली आहे. तर प्रदीप विठ्ठल हिरवे यांची तीन एकर केळीची बागही आडवी झाली आहे. याशिवाय अभिजीत महादेव हिरवे यांची साडेतीन एकर केळीची बाग जमीनदोस्त झाली आहे. राज्यात केळीचे हब होऊ पाहणाऱ्या करमाळा तालुक्याला मोठा फटका बसला असून अंदाजे 15 ते 20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.


देशासह राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल


सध्या देशासह राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं उन्हाचा तडाका जाणवत आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही भागात दुपारपर्यंत उन्हाचा जोर पाहायला मिळत आहे. तर दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसलथ असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहातीनुसार राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्ता पुढील काही दिवसात कायम आहे. त्यामुळं पुन्हा अवकाळी पाऊस कोसळणार आहे. हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार 25 मे पर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहणार आहे. या अवकाळी पावसाच्या वेळी वादळी वारे देखील वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आलाय. 


महत्वाच्या बातम्या:


Unseasonal Rain : अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा तडाखा, 100 पोपट दगावले, शेतीचेही मोठे नुकसान