Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळी अगदी जवळ आला आहे. या सोहळ्याला सरुवात होण्यासाठी अवघे तीनच दिवस बाकी आहेत. येत्या 22 जानेवारीला राम मंदिर उद्घाटन सोहळा होणार आहे. तुम्ही जर अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल, तर फ्लाइट आणि ट्रेन फुल्ल असल्यामुळं तिकीट मिळणं अशक्य आहे. अशात तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण अयोध्येला जाण्यासाठी मोफत बसचे तिकिट (Free Bus Ticket) उपलब्ध होऊ शकते. पाहुयात याबाबतची माहिती.
जर तुम्हाला एकही पैसा खर्च न करता अयोध्येला मोफत पोहोचायचे असेल तर तुम्ही पोहोचू शकता. मोबाईल वॉलेट कंपनी पेटीएमने (Paytm) मोफत बस तिकीट देण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा घेऊन तुम्ही सहज अयोध्येला पोहोचू शकता. पेटीएमने आजपासून मोफत बस सेवा सुरू केली आहे.
मोफत तिकीट कसे मिळवायचे?
पेटीएमकडून मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येला मोफत बसचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांना पेटीएम अॅपद्वारे तिकीट बुक करावे लागेल. या अॅपवरील पहिल्या 1,000 वापरकर्त्यांना मोफत बस तिकिटे मिळतील. यासाठी त्यांना BUSAYODHYA हा प्रोमो कोड वापरावा लागेल. ही विशेष ऑफर आजपासून (19 जानेवारीपासून) उपलब्ध आहे.
थेट बस ट्रेकिंग सेवा
प्रवासाचा अनुभव वाढवण्यासाठी पेटीएमने थेट बस ट्रॅकिंग सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. हे सुनिश्चित करते की वापरकर्ते सहजतेने प्रवास करू शकतात. बुक केलेल्या बसचे रिअल-टाइम स्थान त्यांच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या: