मुंबई : आता ऑगस्ट महिना यायला अवघे काही दिवस शिल्लक आहे. सध्या पावसाळा चालू आहे. राज्यात तसेच देशभरात ठिकठिकाणी पाऊस पडतोय. याच पार्श्वभूमीवर अनेकजण सुट्ट्या घेऊन फिरायला जात आहेत. ज्यांना सुट्टी घेणं शक्य होत नाहीये, ते विकएंडला दोन दिवसांची ट्रिप काढून सध्या खुललेल्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत आहेत. दरम्यान, फिरण्याची आवड असणाऱ्यांना तसेच अन्य महत्त्वाची कामे करण्यासाठी सुट्ट्यांची गरज असणाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात तब्बल 5 दिवसांची सुट्टी मिळू शकते. त्यासाठी त्यांना फक्त एक गोष्ट करावी लागणार आहे. 


ऑगस्ट महिन्यात पाच दिवसांची सुट्टी


तुम्ही पुढच्या महिन्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यााठी ऑगस्ट महिन्यातील पाच दिवसांची सुट्टी चांगली पर्वणी ठरू शकते. तुम्हाला फिरायला जायचे अशेल तर त्याचं प्लॅनिंग करायला लागा. तसेच प्रवासाचे तिकीट, हॉटेल बुकिंक, आताच बुक करून टाकायला हरकत नाही. ऑगस्ट महिन्यात एकूण दोन मोठे विकएंड अणार आहेत. सरकारी कर्मचारी तसेच कार्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हे विकएंड फिरण्यासाठीची चांगली संधी आहे. 


ऑगस्ट महिन्यातील दोन लॉन्ग विकएंड कोणते? 


कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक कंपन्यात शनिवार आणि रविवारी सुट्टी असते. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ऑगस्टमध्ये एकूण दोन लॉन्ग विकएंड असणार आहेत. 15 अगस्ट रोजीच्या स्वातंत्र्यदिनामुळे देशभरात सुट्टी असेल. त्यानंतर 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. तुम्ही शुक्रवारी (16 ऑगस्ट) रजा टाकल्यास तुम्हाला सलग पाच दिवसांच्या सुट्टीचा आनंद लुटता येईल. याच पाच दिवसांच्या सुट्टीत तुम्ही विदेशवारीही करू शकता. मात्र पाच दिवसांच्या सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला शुक्रवारी (16 ऑगस्ट) ऑफिसला रजेचा अर्ज करावा लागेल. 


असा असेल पाच दिवसांचा लॉन्ग विकएंड 


1. गुरुवार, 15 ऑगस्त: स्वातंत्र्य दिन 


शुक्रवार, 16 ऑगस्ट: एका दिवसाची रजा टाकावी लागेल. 


शनिवार, 17 ऑगस्ट- विकएंड सुट्टी


रविवार, 18 ऑगस्ट- रविवारची सार्वजनिक सुट्टी


सोमवार, 19 ऑगस्ट: रक्षाबंधन


ऑगस्ट महिन्यात आणखी तीन दिवसांच्या सलग सुट्ट्या


कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात आणखी तीन दिवसांच्या सुट्ट्या मिळणार आहेत. या महिन्यात 24 ऑगस्ट रोजी  शनिवार आहे. त्यानंतर 25 ऑगस्टला रविवार आहे. 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आहे. म्हणजेच 24  ते 26 ऑगस्ट अशा तीन दिवस तुम्हाला सलग सुट्टी असेल.


हेही वाचा :


मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करताय? पण 'ही' अट तुम्ही करताय का पूर्ण?


आता घरपोच मिळणार दारु? 'या' 6 राज्यांमध्ये प्रोजेक्टवर काम सुरु, मद्य उद्योगासाठी निर्णय ठरणार गेमचेंजर