Atal Pension Yojana : अलिकडच्या काळात गुंतवणुकीचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी गुंतवणूक खूप महत्वाची आहे. सरकारी योजना अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana) गुंतवणूक (Investment) केल्यानं, तुम्हाला केवळ हमी पेन्शनच नाही तर इतर अनेक फायदेही मिळतात. यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. हा कर लाभ आयकर कलम 80C अंतर्गत दिला जातो.
अटल पेन्शन योजना वृद्धापकाळासाठी आधार आहे. निवृत्तीनंतर त्यांचे वृद्धापकाळ कोणत्याही आर्थिक समस्यांशिवाय आरामात पार पडावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी ते आपल्या कमाईतून बचतही करतात. अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करतात. जेणेकरुन त्यांना त्यांच्या खर्चासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये. अशा वेळेस पेन्शन उपयोगी पडते, म्हणजेच ते नियमित उत्पन्नाचे साधन बनते. जर तुम्ही तरुण असाल तर दर महिन्याला थोडी थोडी रक्कम जमा करुन तुम्ही तुमच्या वृद्धापकाळाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करू शकता. जेणेकरुन कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. सरकार चालवत असलेली अटल पेन्शन योजना या बाबतीत खूप लोकप्रिय आहे.
5000 रुपयांपर्यंत निवृत्ती वेतनाची हमी
तुमच्या वृद्धापकाळाचा आनंद घेण्यासाठी, अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल. ही पेन्शन योजनेत सरकार स्वतः पेन्शनची हमी देते. तुम्ही या योजनेत दररोज थोडी बचत करुन गुंतवणूक करु शकता. तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,000 ते रु. 5,000 पर्यंत पेन्शन मिळू शकते. याचा अर्थ निवृत्तीनंतर तुमचे नियमित उत्पन्न निश्चित आहे. APY योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
20 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल
अटल पेन्शन योजनेंतर्गत निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी किमान 20 वर्षे गुंतवणूक करणं आवश्यक आहे. यानंतर तुमची पेन्शन सुरु होते. जर तुम्हाला हे दुसऱ्या प्रकारे समजले तर, तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत गुंतवणूक चालू ठेवावी लागेल. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यानं, तुम्हाला केवळ हमी पेन्शनच नाही तर इतर अनेक फायदेही मिळतात. यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. हा कर लाभ आयकर कलम 80C अंतर्गत दिला जातो. लक्षात ठेवा की आयकर भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
दरमहा 5000 रुपये पेन्शन कशी मिळेल?
समजा तुमचे वय 18 वर्षे आहे, तर दरमहा 210 रुपये जमा करुन, म्हणजे या योजनेत दररोज फक्त 7 रुपये जमा करा. तुम्ही 60 वर्षानंतर दरमहा 5000 पेन्शन घेऊ शकता. जर तुम्हाला दरमहा 1,000 रुपये पेन्शन हवी असेल, तर तुम्हाला या कालावधीत या योजनेत दरमहा केवळ 42 रुपये जमा करावे लागतील. या योजनेअंतर्गत तुम्हाला 10000 रुपये पेन्शन देखील मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या: