Tomato News : भाज्यांमध्ये टोमॅटोची (Tomato) भूमिका खूप महत्त्वाची मानली जाते. भाजीची चव वाढवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. तसेच आरोग्यासाठीही टोमॅटो फायदेशीर ठरत आहे. टोमॅटोमध्ये असलेल्या गुणधर्मांच्या आधारावर त्याची गणना सुपर फूड म्हणून केली जाते. टोमॅटो दिसायला तितकाच छान आहे जितका खायला रुचकर आहे. टोमॅटोचा भाजी म्हणून वापर करण्यासोबतच लोक त्यांचा वापर चटणीसह सूपच्या स्वरूपात करतात. दरम्यान, भारतात पिकणाऱ्या ‘अर्का रक्षक’टोमॅटोला परदेशात मोठी मागणी आहे. या टोमॅटोच्या लागवडीतून एका एकरात 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत आहे. 


पाकिस्तान, घाना, मलेशियात ‘अर्का रक्षक’ टोमॅटोला मोठी मागणी


इंडियन हॉर्टिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, बंगळुरुने ‘अर्का रक्षक’ हा टोमॅटो विकसित केला आहे. 
परदेशात या भारतीय टोमॅटोला मोठी मागणी आहे. एक एकरात लागवड करून शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. या टोमॅटोची मागणी केवळ भारतातच नाही तर पाकिस्तान, घाना, मलेशिया अशा जगातील अनेक देशांमध्ये आहे. 'अर्का रक्षक' टोमॅटोची उत्पादन क्षमता 18 किलो प्रति रोप आहे. या टोमॅटोची लागवड करून शेतकऱ्यांना एकरी चार ते पाच लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. या टोमॅटोची लोकप्रियता आणि टोमॅटोची मागणी पाहून त्याचे उत्पादन वाढावे यासाठी नॅशनल सीड कॉर्पोरेशनकडून मोठ्या प्रमाणात त्याचे बियाणे तयार केले जात आहे.


टोमॅटोचा सध्याचा बाजारभाव किती?


आता 23 जानेवारी रोजी संपूर्ण भारतातील किरकोळ बाजारात टोमॅटोची सरासरी किंमत 32 रुपये किलोवर पोहोचली आहे, तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत टोमॅटोचा भाव 40 रुपये किलोच्या आसपास आहे. तर अनेकांना असे वाटते उन्हाळ्यात या टोमॅटोच्या किंमती आणखी वाढू शकतात. 


महत्त्वाच्या बातम्या:


पालक शेतीचा अनोखा प्रयोग, तरुण शेतकऱ्यांनी केली 15 लाखांची कमाई