Shoaib Malik : नुकतेच अभिनेत्री सना जावेदशी तिसरे लग्न करणाऱ्या पाकिस्तानच्या शोएब मलिकचे आणखी एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. बांगला देश प्रिमिअर लीग दरम्यान मलिकने मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगला देश प्रिमिअर लीगमधील शोएबच्या संघाने त्याचा करार रद्द केलाय. दरम्यान, आता शोएबला बांगलादेश प्रिमिअर लीगमध्ये एकही सामना खेळता येणार नाही, असे बोलले जात नाही. शोएब मलिक बीपीएलची स्पर्धा सुरु असतानाच दुबई परतला आहे. त्याने कौटुंबिक कारणे देत स्पर्धेतून माघार घेतली असल्याचे बोलले जात आहे.
लागोपाठ 3 नो बॉल टाकून केली मॅच फिक्सिंग?
शोएब मलिक बांगला देश प्रिमिअर लीगमध्ये फॉर्च्यून बारिशल या संघाचा भाग होता. त्याने 22 जानेवारीला मीरपूरमध्ये खुलना टायगर्स विरोधात फॉर्च्यून बारिशलचा सामना होता. या सामन्यात खेळत असताना शोएब मलिकने लागोपाठ 3 नो बॉल टाकले आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर शोएबचे तुफान ट्रोलिंग सुरु आहे. पाकिस्तानी चाहत्यांनीही त्याला ट्रोल करताना सुट्टी दिलेली नाही. आता या प्रकरणामुळे शोएबच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार आहे. या प्रकरणात दोषी आढळला तर त्याला कडक शिक्षा सुनावली जाऊ शकते. त्यामुळे उर्वरित स्पर्धेत शोएब खेळणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एका षटकात दिल्या 18 धावा
बांगलादेश प्रिमिअर लीगमध्ये फॉर्च्यून बरिशलकडून खेळत असताना शोएब मलिकने 18 धावा दिल्या. फॉर्च्यून बरिशलचे नेतृत्व तमीम इकबाल याच्याकडे आहे. टायगर्स विरोधात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या फॉर्च्युनच्या संघाने 20 षटकांमध्ये 187 धावा केल्या. मुशफिकिर रहिमने 68 धावांची खेळी केली. खुलना टायगर्सचा संघ फलंदाजीसाठी उतरला असता तमिम इकबालने शोएब मलिकला गोलंदाजी करण्यास सांगितले. मात्र, शोएब मलिक चांगलाच महागडा ठरला. मलिकने चौथ्या षटकात लागोपाठ 3 नो बॉल टाकले. सुरुवातीच्या 5 चेंडूमध्ये मलिकने केवळ 6 धावा दिल्या होत्या. मात्र, शेवटच्या चेंडूवर त्याने 12 धावा दिल्या. त्यामुळेच शोएबवर मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात येत आहेत. खुलना टायगर्सने या सामन्यात 18 व्या षटकात विजय मिळवला.
शोएब मलिकची कारकिर्द
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने 528 टी 20 सामने खेळले असून 13,022 (आंतरराष्ट्रीय आणि इतर स्पर्धेतील एकत्र) धावा केल्या आहेत. या शिवाय त्याने 178 विकेट पटकावल्या आहेत. मलिकच्या जागी फॉर्च्यून बरिशल या संघाने अहमद शहजादला संधी दिली आहे. मलिकने 35 कसोटी सामने खेळत 1889 धावा केल्या तर 32 विकेट्स पटकावल्या आहेत. वनडेमध्ये मलिकच्या नावावर 7534 धावा आणि 158 विकेट्स आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या