मुंबई : या आठवड्यात तुम्ही बँकेशी संबधित काही कामे करणार असाल तर योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कारण या आठवड्यात एकूण पाच दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहेत. वेगवेगळ्या सणांमुळे तसेच आठवड्याच्या सुट्टीमुळे (April Month Bank Holiday) या आठवड्यात फक्त दोन दिवसच बँका चालू राहतील. मात्र वेगवेगळ्या राज्यातील बँकांसाठी वेगवेगळे नियम असू शकतात.
या दिवशी बँका बंद राहणार
भारतीय स्टेट बँकेसह इतर सरकारी बँकांमध्ये या आठवड्यात काही राज्यांत ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा, उगादी, तेलुगु नववर्षानिमित्त सुट्टी देण्यात आली आहे. १० एप्रिल रोजी बोहाग बिहू हा सण, ११ एप्रिल रोजी ईद अशा वेगवेगळ्या सणांनिमित्त बँका स्थानिक नियमांनुसार बंद राहण्याची शक्यता आहे. यासह १३ एप्रिल रोजी दुसरा शनिवार आहे. तर १४ एप्रिल रोजी रविवार आहे. या दोन्ही दिवशी देशभरातील बँका बंद राहतील.
काही राज्यांत १५ आणि १६ एप्रिल रोजीदेखील काही बँका बंद राहू शकतात. या सर्व सुट्ट्या प्रत्येक राज्यासाठी वेगळ्या असू शकतात.
कोणत्या दिवशी-कोणत्या सणामुळे बँका बंद?
5 एप्रिल- या दिवशी बाबू जगजीवन राम, जाअत उल विदा यांचा जयंती आहे. (या दिवशी तेलंगणा आणि जम्मू काश्मीरमध्ये बँका बंद असतील)
९ एप्रिल - महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, मणिपूर, गोवा, जम्मू , श्रीनगर या भागात बँका गुढीपाडवा, उगादी महोत्सव, तेलुगू नववर्ष दिन, नवरात्र यामुळे बँका बंद असतील.
१० एप्रिल- बोहाग बिहू, चेइरा ओबा यामुळे त्रिपुरा, आसाम, मणिपूर, जम्मू आणि श्रीनगर या राज्यांत बँका बंद राहतील.
१३ एप्रिल- दुसरा शनिवार
१५ एप्रिल- बोहाग बिहू, हिमाचल दिवसामुळे हिमाचल प्रदेश, आसाम येथील बँका बंद राहतील
१६ एप्रिल- राम नवमीमुळे गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश उडिसा, चंदीगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांतील बँका बंद राहतील.
२० एप्रिल- गरियी पूजाच्या निमित्ताने त्रिपुऱ्यात बँका बंद असतील.
हेही वाचा :
सोने तारण ठेवून कर्ज घ्यावं का? नेमकी काय काळजी घ्यावी? सोप्या भाषेत जाणून घ्या RBI चे नियम!
सोनं रोजच खातंय भाव! पण का? सोन्याचा दर कसा ठरवतात? समजून घ्या सोप्या शब्दांत!
हावी पास, पोस्टर्स लावून पोट भरलं, आता 4 हजार कोटींच्या उद्योगाचे मालक ; चंदुभाई विरानी कोण आहेत?