मुंबई : राज्यावरील ओमायक्रॉनच्या (Omicron) संकटाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. कोरोना रुग्णसंख्येसोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. आज एकाच दिवसात राज्यात ओमायक्रॉनच्या 144 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली आहे.


राज्यात सापडेलल्या रुग्णांपैकी 100 रुग्ण केवळ मुंबईतील आहेत. त्यानंतर नागपुरात 11, ठाणे आणि पुणे शहरात प्रत्येकी 7, पिंपरी चिंचवड या ठिकाणी 6, कोल्हापुरात 5, अमरावती, उल्हासनगर आणि भिवंडीमध्ये प्रत्येकी 2, पनवेल आणि उस्मानाबाद या ठिकाणी प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. 


राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या एकूण 797 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 330 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज सापडलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी 26 रुग्ण हे राज्यातील नागरिक आहेत तर 9 रुग्ण हे परदेशी नागरिक आहेत. 


पिंपरी चिंचवड शहरात आणखी सहा ओमयक्रोनचे रुग्ण आढळले आहेत. यात 2 यूएई तर जपान, सिंगापूर, केनिया आणि यूएसएचा प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड शहरात आत्तापर्यंत एकूण 40 ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 9 हे रुटीन चेकअप मधील ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आहेत तर 25 रुग्णांनी ओमयक्रॉन वर मात केलेली आहे.


दरम्यान, राज्यात आज तब्बल  26 हजार 538 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5331 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आज  आठ  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 87  हजार 505 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 24 हजार 247 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.55 टक्के आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :