Job opportunities News : रोजगाराच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आलीय. युवकांसाठी एका कंपनीत मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी (Job opportunities) उपलब्ध होार आहेत. आयफोन निर्मिती कंपनी Apple या कंपनीमध्ये लाखो नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या तीन वर्षात  Apple कंपनीमध्ये पाच लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. 


Apple कंपनी भारतात आपलं उत्पादन झपाट्यानं वाढवणार 


विशेष म्हणजे Apple कंपनीमध्ये भारतात या पाच लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळं देशातील युवकांसाठी दिलासा देणारी ही बातमी आहे. यामुळं भारतातील नोकऱ्यांची संख्या तीन पटीनं वाढणार आहे. Apple कंपनी भारतात आपलं उत्पादन झपाट्यानं वाढवणार आहे. व्यवसायाचा विस्तार करण्याच्या संदर्भानं हालचीलांना देखील वेग आलाय. Apple भारतात अधिक गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. 


जगातील एकूण आयफोन उत्पादनापैकी 7 आयफोन हे भारतात तयार होतात


मिळालेल्या माहितीनुसार, Apple कंपनी पुढील तीन वर्षात भारतात पाच लाख नोकऱ्या देणार आहे. यामुळं  Apple शी संबधीत कर्मचाऱ्यांच्या संख्येत तीन टक्क्यांची वाढ होणाराय. या निर्णयामुळं अप्रत्यक्ष रोजगारातही वाढ होणाराय. सध्या जगातील एकूण आयफोन उत्पादनापैकी 7 आयफोन हे भारतात तयार होतात. 2030 पर्यंत याची संख्या 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्यामुळं देशात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होमार आहेत. ही तरुणासाठी मोठी संधी असणार आहे. ज्या युवकांना अॅपल कंपनीमध्ये काम करायचे आहे, त्यांची इच्छा आता पूर्ण होण्यास मदत होणाराय. 


 भारतातील उत्पादन वाढवण्याचा Apple कंपनीचा विचार 


मिळालेल्या माहितीनुसार, Apple कंपनीला भारतातील उत्पादन वाढवायचं आहे. आपल्या व्यवसायाचा या ठिकाणी मोठा विस्तार करायचा आहे. देशात  स्थानिक मूल्यवर्धन 15 ते 18 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा विचार आहे. दरम्यान, सध्याच्या काळात भारतात आयफोनच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. 


महत्वाच्या बातम्या:


iPhone 15 सीरिज, iPad ते मॅकबुक, स्मार्टवॉचपर्यंत सर्व गॅजेट्सवर मिळतेय भन्नाट ऑफर; विजय सेल्सची घोषणा