Chandrababu Naidu Family Wealth: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीत (Wealth) मोठी घट झाली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये हेरिटेज फूड्स या कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांनी घसरुन 578 रुपयांवर बंद झाले होते. यामुळं नायडू कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले आहे.
चंद्राबाबू नायडूंचा पक्ष टीडीपी आंध्र प्रदेशात सत्तेवर आल्यानंतर आणि एनडीएला लोकसभेत बहुमत मिळाल्यानंतर, नायडूंशी संबंधित असलेल्या हेरिटेज फूड्स या कंपनीच्या शेअर्समध्ये शेअर बाजारात मोठी वाढ दिसून आली होती. त्यामुळं नायडू कुटुंबीयांच्या संपत्तीत विक्रमी वाढ झाली आहे. मात्र, आता हेरिटेज फूड्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली आल्यानं नायडू कुटुंबियांच्या संपत्तीत घट झाल्याचे दिसून येत आहे.
नायडू यांच्या मुलासह त्यांच्या पत्नीचेही नुकसान
दरम्यान, नायडू यांच्या मुलासह त्यांच्या पत्नीचेही नुकसान झाले आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये हेरिटेज फूड्सचे शेअर्स 20 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. शुक्रवारी त्याचे शेअर्स 3 टक्क्यांनी घसरून 578 रुपयांवर बंद झाले. जेव्हा हा स्टॉक चर्चेत होता, तेव्हा त्याने केवळ 12 दिवसांत दुप्पट परतावा दिला होता. परंतू, गेल्या एका महिन्यात केवळ 61 टक्के परतावा दिला आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी 727.35 रुपये आहे आणि निम्न पातळी 208.20 रुपये प्रति शेअर आहे.
नायडू कुटुंबाकडे हेरिटेजचे किती शेअर्स?
हेरिटेज फूड्स लिमिटेडच्या शेअर होल्डिंग पॅटर्नवर आपण जानेवारी आणि मार्च 2024 मध्ये पाहिल्यास, चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांच्याकडे हेरिटेज फूड्सचे सर्वाधिक 2,26,11,525 शेअर्स आहेत. जे कंपनीच्या एकूण स्टेकच्या 24.37 टक्के आहे. चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांच्याकडे या कंपनीत 1,00,37,453 शेअर्स किंवा 10.82 टक्के हिस्सा आहे. याशिवाय त्यांची सून आणि इतर सदस्यांचीही या कंपनीत हिस्सेदारी आहे. कुटुंबाकडे हेरिटेज फूडमध्ये एकूण 3,31,36,005 शेअर्स किंवा 35.71 टक्के हिस्सा आहे.
नायडू कुटुंबाचे एकूण 497 कोटी रुपयांचे नुकसान
गेल्या आठवडाभरात हेरिटेज फूड्सचे शेअर्समध्ये 21 टक्के किंवा 150 रुपयांची घट झाली आहे. अशा परिस्थितीत चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीचे अंदाजे 339 कोटींचे आणि मुलगा नारा लोकेशचे 150 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नायडू कुटुंबाचे एकूण 497 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, चंद्राबाबू नायडू आणि त्यांची पत्नी नारा भुनेश्वरी यांची संपत्ती 931 कोटींहून अधिक आहे.
महत्वाच्या बातम्या:
आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री चंद्राबाबूंची संपत्ती किती? सविस्तर माहिती एका क्लिकवर